एक्स्प्लोर

Steel Price Reduce : स्टीलच्या दरात मोठी घट, चार महिन्यात प्रतिटन 20 हजारांची घसरण

Steel Price Reduce : स्टीलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील चार महिन्यात स्टीलच्या दरात प्रतिटन 20 हजारांची घसरण झाली आहे.

Steel Price Reduce : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांसह व्यावसायिकांचीही चिंता वाढवली होती. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) महागाईचा भडका उडाला होता. युद्धामुळे मागणी आणि पुरवठा साखळीवर या युद्धाचा परिणाम झाला होता. युद्धाला सहा महिने उलटल्यानंतर ही जागतिक व्यापाराला बसलेली झळ काही प्रमाणात कमी झाली आहे. जगातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची चिन्हे दिसत आहे. महागाईला काही प्रमाणात आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांचा परिणाम दिसू लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात मोठी घसरण (Steel Price Reduce) झाली आहे. मागील चार महिन्यात स्टीलचे दर प्रतिटन 20 हजार रुपयांनी घसरले आहेत.  

बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचे दर चार महिन्यानंतर घसरल्याने बांधकाम खर्च कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यात 85 हजार रुपये प्रतिटन असलेलेले स्टील 20 हजारांनी कमी झाले आहेत. सध्या स्टीलचा दर 65 हजार रुपये प्रतिटन इतका आला आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात स्टीलचे दर आजवरच्या सर्वात उच्चांकी म्हणजेच 85 हजार रुपये प्रति टनावरती पोहोचले होते. त्यानंतर आता स्टीलच्या दरात घसरण दिसून येत आहे.  

दर का घसरले?

स्टीलच्या निर्यातीवर केंद्र सरकारने करात वाढ केली होती. त्याचा परिणाम निर्यातीवर झाल्याचे दिसून आले आहे. निर्यातीवरील शुल्कामुळे परदेशात जाणारे स्टील महागले. त्याशिवाय काही स्टील उत्पादकांनी निर्यातदेखील कमी केली. स्टीलला मागणी अत्यल्प आहे. त्याचा परिणामही स्टीलच्या दरावर झाला असल्याचे म्हटले जाते. 

दरम्यान, एकीकडे स्टीलला असलेली कमी मागणी आणि दुसरीकडे कच्या मालाचे भाव जैसे थे असल्याने स्टील उद्योजकांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येणारे काही महिने स्टीलच्या दरात आणखी कपात होणार नसल्याचे म्हटले जात आहे. आधीच स्टील उत्पादकांना मोठा फटका बसला असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मागील एक-दोन महिन्यापासून स्टील उद्योजकांनी उत्पादनात कपात केली आहे. दिवाळीच्या सुमारास बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रातून पुन्हा मागणी पूर्ववत होईल आणि स्टीलची मागणी वाढेल अशी अपेक्षा स्टील उद्योजकांना असल्याचे पोलाद ग्रुपचे सहसंचालक नितीन काबरा यांनी म्हटले. 

केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्याने  भारताचा निर्यातीमधील प्रमाण कमी झाले. बऱ्याच उद्योजकांनी  आपले उत्पादन कमी केले. केंद्राकडून निर्यात शुल्क कमी होईल, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर स्टील उद्योगाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

महत्त्वाच्या बातम्या

FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget