Share Market Updates: शेअर बाजारात तेजीचे संकेत, सेन्सेक्सने ओलांडला 54600 अंकाचा टप्पा
Share Market Updates : भारतीय शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर तेजीचे संकेत दिसून आले.
Share Market Updates : जागतिक शेअर बाजारात असलेल्या सकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच तेजीचे संकेत दिसून आले. प्री ओपनिंग सत्रात निफ्टीत किंचीत घसरण दिसून आली. मात्र, सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. आयटी, बँकिंग, मेटल आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. भारतीय शेअर बाजारात आज मिडकॅप, स्मॉलकॅपसह लार्ज कॅपमध्ये तेजी दिसून आली.
आज शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स वधारला होता. मात्र, त्यानंतर पु्न्हा घसरला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांकात 168.76 अंकानी घसरला. तर, निफ्टी निर्देशांकात 48.55 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी 16,194 अंकावर ट्रे़ड करत होता.
जागितक शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून आले. अमेरिकन शेअर बाजारात डाओ फ्यूचर्समध्ये उसळण दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसत आहे. आशियाई शेअर बाजारातही सकारात्मक संकेत आहेत.
निफ्टीतील 50 पैकी 40 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, उर्वरिक 10 शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, बँक निफ्टी 234 अंकानी वधारला. बँक निफ्टी निर्देशांक 34717 अंकाच्या पातळीवर व्यवहार करत आहे. वित्तीय क्षेत्रातील स्टॉकमध्ये तेजी दिसत आहे.
निफ्टीमध्ये यूपीएल 2.68 टक्के आणि एचडीएफसी लाइफमध्ये 2.47 टक्क्यांनी वधारला आहे. अदानी पोर्टस 1.80 टक्क्यांनी, पॉवरग्रीडमध्ये 1.66 टक्के आणि ओएनजीसीमध्ये 1.65 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
एशियन पेंट्समध्ये 2.19 टक्के, सिप्लामध्ये 1.43 टक्के आणि एचयूएलमध्ये 0.65 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
दरम्यान, मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 192 अंकानी तर निफ्टीही 91 अंकानी घसरला होता.सेन्सेक्स 54,278 अंकावर आणि निफ्टी 16,211 वर बंद झाला. मेटल्स क्षेत्रातल्या शेअर्समध्ये तब्बल पाच टक्क्यांची घसरण झाली. बाजार बंद होताना आज मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, आरोग्य, आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाली