Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, सेन्सेक्स 860 अंकांनी गडगडला
Share Market Today : शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. बाजार सुरु होताच सेन्सेक्स 650 अंकानी घसरला.
Share Market Today : आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या घसरणीच्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास सव्वा टक्के घसरण झाली आहे.
आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा, सेन्सेक्स निर्देशाकांत 647.37 अंकाती घसरण होत 54,188.21 अंकावर खुला झाला. तर, निफ्टीत 183.55 अंकाची घसरण होऊन 16,227.70 अंकावर सुरू झाला. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 757.16 अंकाची घसरण होत 54,080 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 222 अंकाची घसरण होऊन 16,189 अंकावर व्यवहार करत होता.
आज सर्वाधिक घसरण मेटल स्टॉकमध्ये दिसून येत आहे. मेटल स्टॉकमध्ये 2.75 टक्क्यांची घसरण झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर दरात 2.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑइल अॅण्ड गॅस दरात दोन टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. आज एनएसईच्या सर्व क्षेत्रातील शेअर दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
एनएसईमध्ये आज यूपीएलच्या शेअर दरात 0.82 टक्के आणि इन्फोसिसच्या शेअर दरात 0.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बजाज ऑटो आणि एचसीएल टेक शेअरमध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बजाज फिनसर्व्हमध्ये 0.39 टक्क्यांची तेजी दिसत आहे.
टेक महिंद्राच्या शेअर दरात 3.74 टक्के, इंडसइंड बँकेत 2.77 टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2.59 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. टाटा मोटर्समध्ये 2.57 टक्के आणि जेएसडब्लू स्टीलमध्ये 2.47 टक्क्यांची घसरण दिसत आहे.
रुपयात घसरण
आज डॉलरच्या तुलनेत रुपयांत 21 रुपयांची घसरण झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 77.13 प्रति डॉलर इतक्या किंमती खुला झाला आहे. हा रुपयाचा आतापर्यंतचा नीचांकी दर आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत 76.92 रुपये इतकी झाली आहे.