(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने ओलांडला 60 हजार अंकाचा टप्पा
Share Market Updates : शेअर बाजाराने तेजीचे वातावरण दिसत असून सेन्सेक्सने 60 हजार अंकाचा टप्पा ओलांडला.
Share Market Updates : शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसूत असून सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजार सुरू होताच काही सेन्सेक्सने 59900 अंकाचा टप्पा ओलांडला होता. तर, निफ्टी 17900 अंकापर्यंत आला होता. जागतिक बाजारपेठांमध्ये पुन्हा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. अमेरीका आणि आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीकडून बाजारात राखीव साठा
आज सकाळी शेअर बाजारात शानदार तेजी दिसून आली. सेन्सेक्सची सुरुवात 59764 अंकावर झाली. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने 59900 अंकाचा टप्पा गाठला. तर, निफ्टीची सुरुवातही चांगली झाल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या वेळेत निफ्टीने 17900 चा स्तर गाठला. मात्र, काही वेळेनंतर नफा वसुली दिसून आली.
सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1441 अंकांनी वधारून 60693.87 अंकावर ट्रे़ड करत होता. तर, निफ्टीत 401 अंकांची उसळण दिसून आली. निफ्टी 18,071.50 अंकावर व्यवहार करत होता.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण
आज बाजार उघडण्यापूर्वी HDFC आणि HDFC बँक विलीन होत असल्याची बातमी आली. HDFC चे 25 शेअर्स असणाऱ्या शेअरधारकांना HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे त्यांच्या समभागांमध्ये जोरदार वाढ झाली आहे. HDFC बँक 2 वर्षातील सर्वात मोठ्या तेजीसह व्यवसाय करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Investment Tips : छोट्या गुंतवणुकीत चांगले परतावे हवे आहेत! 'हे' पर्याय वापरून पाहा
- 1400 कोटींसाठी अॅमेझॉनने 26 हजार कोटींची कंपनी उद्धवस्त केली, फ्युचर ग्रुपचा आरोप
- Adani : स्टेट बँकेकडून अदानींचे 12,770 कोटींचे कर्ज अंडरराइट; नवी मुंबई विमानतळासाठी घेतलं होतं कर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha