एक्स्प्लोर

1400 कोटींसाठी अॅमेझॉनने 26 हजार कोटींची कंपनी उद्धवस्त केली, फ्युचर ग्रुपचा आरोप

Amazon Future Group Deal : फ्युचर ग्रुपने अॅमेझॉनवर सुप्रीम कोर्टात गंभीर आरोप केले. फक्त 1400 कोटींसाठी त्यांनी आमची 26 हजार कोटींची कंपनी उद्धवस्त केली असल्याचे फ्युचर ग्रुपने म्हटले.

Amazon Future Group Deal : भारतातील रिटेल क्षेत्रातील वर्चस्वावरून सुरू असलेला वाद शमण्याची चिन्हं दिसत नाही. फ्युचर ग्रुपची कंपनी फ्युचर रिटेल आणि अॅमेझॉन दरम्यान सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली. अॅमेझॉनने 1400 कोटींसाठी 26000 कोटींची आमची कंपनी उद्धवस्त केली असल्याचे फ्युचर ग्रुपने सुप्रीम कोर्टात सांगितले. 

कोर्टाबाहेर तोडगा नाहीच 

याआधी सुप्रीम कोर्टाने अॅमेझॉन (Amazon Inc) आणि फ्युचर रिटेल लिमिटेड (Future Retail Limited)यांना चर्चेतून मार्ग काढण्यास सांगितले होते. मात्र, दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. या दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्यूचर रिटेलचे बहुतांशी बिग बाजार आपल्या नियंत्रणात घेतले. किशोर बियानी यांच्या फ्युचर रिटेलने 4800 कोटी रुपयांचे भाडे न दिल्याने त्यांच्या नियंत्रणातील स्टोअर्स ताब्यात घेण्याशिवाय पर्याय नव्हता, असा तर्क रिलायन्सने दिला होता.

अॅमेझॉनने याआधी फ्युचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजवर फसवणुकीचा आरोप लावला. त्यासाठी अॅमेझॉनने वृत्तपत्रांद्वारे जाहिरातीदेखील छापल्या. अॅमेझॉनसोबत फ्युचर ग्रुपचा करार हा फक्त 1400 कोटी रुपयांचा आहे. अॅमेझॉनने फक्त या रक्कमेसाठी 26 हजार कोटींची कंपनी उद्धवस्त केली असल्याचा आरोप फ्युचर ग्रुपने केला. आम्हाला उद्धवस्त करण्याचा अॅमेझॉनचा डाव होता आणि त्यात ते यशस्वी ठरले असल्याचेही फ्युचर ग्रुपने म्हटले. 

रिलायन्से स्टोअर्स ताब्यात घेतल्याच्या मुद्यावर कंपनीने म्हटले की, आमच्यासोबत कोणीही व्यवसाय करत नाही. आम्हाला लँडलॉर्ड अॅविक्शन नोटीस पाठवल्यावर आम्ही काय करणार असे हताश भूमिका कंपनीने कोर्टात मांडली. आतापर्यंत आम्हाला 835 स्टोअरचे नुकसान झाले असल्याचे फ्युचर ग्रुपने सांगितले. उर्वरित 374 स्टोअर हे इतरांच्या कृपेमुळे सुरू असल्याचे कंपनीने म्हटले. 

रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपची मिलीभगत; अॅमेझॉनचा आरोप

अॅमेझॉनचे वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपची मिलीभगत असल्याचे कोर्टात सांगितले. फ्युचर ग्रुपने सहजपणे आपले स्टोअर्स सहजपणे रिलायन्सच्या ताब्यात दिले याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

या प्रकरणी पुढील सुनावणी 4 एप्रिल रोजी होणार आहे. फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्री दरम्यान 3.4 अब्ज डॉलरचा करार झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Aadhaar Card Limit Exhausted : आधारकार्ड दुरुस्त लिमिट संपली? चिंता करू नका, ही ट्रिक्स वापरा!
Aadhaar Card Limit Exhausted : आधारकार्ड दुरुस्त लिमिट संपली? चिंता करू नका, ही ट्रिक्स वापरा!
EPFO :  नोकरी सोडल्यानंतर Date of Exit ची चुकीची नोंद कशी दुरुस्त करायची? ईपीएफओ पोर्टलवर रेकॉर्ड अपडेट कसं करायचं?  
पीएफ खात्यातील चुकलेली Date of Exit कशी दुरुस्त करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Starlink in India : भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
Devendra Fadnavis on western dedicated freight corridor: चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व
चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Embed widget