शेअरचे मूल्य 2 रुपयांपेक्षा कमी, पण एका आठवड्यात तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स, 'या' कंपनीचा जलवा
सध्या शेअर बाजारात असे काही पेनी स्टॉक आहेत, जे गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहेत. याच स्टॉक्समध्ये श्रेष्ठा फिनव्हेस्ट या कंपनीचा समावेश आहे.
मुंबई : शेअर बाजारात (Share Market) रोजच काही कंपन्यांचे शेअर्स पडतात, तर काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. पण गेल्या काही दिवसांपासून श्रेष्ठा फिनव्हेस्ट या आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. कारण पेनी स्टॉकमध्ये मोडणारी ही कंपनी गेल्या काही काळापासून आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. सध्या तर या कंपनीच्या मसभागाने आपले आतापर्यंतचे सर्वोच्च मूल्य (ऑल टाईम हाय) गाठले आहे. पेनी स्टॉक अशल्यामुळे चांगली प्रगती करूनही हा शेअर दोन रुपयांच्या पुढे जाऊ शकला नाही.
एका आठवड्यात शेअरचे मूल्य 20 टक्क्यांनी वधारले (What is Share Price of Srestha Finvest )
श्रेष्ठा फिनव्हेस्ट लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे मूल्य शुक्रवारी 14 जून रोजी 4.02 टक्क्यांच्या तेजीसह 1.81 रुपयांनी वधारले. याआधी सत्र चालू असताना या शेअरचा भाव 5 टक्क्यांनी वधारला होता आणि 1.87 रुपयांपर्यंत मजल मारली होती. हा शेअर गेल्या पाच दिवसांत 20 टक्क्यांनी वधारला आहे
हा शेअर लवकरच ठरणार मल्टिबॅगर (Srestha Finvest share analysis)
वेगवेगळ्या आर्थिक सेवा देणारी श्रेष्ठा फिनव्हेस्ट ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. एका महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी-शेवटी हा शेअर चांगलाच घसरला होता. तो 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर गेला होता. तेव्हा या शेअरचे मूल्य अवघे 1 रुपया झाले होते. पण चालू वित्त वर्षात हा शेअर 87 टक्क्यांनी वधारला आहे. म्हणजेच सध्या या शेअरचे मूल्य दोन रुपयांपेक्षा कमी असले तरी लवकरच हा शेअर मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत जाण्याची शक्यता आहे.
कंपनीचे भांडवल फक्त 105 कोटी रुपये
ही कंपनी सध्या चांगली कामगिरी करत असली तरी या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 105 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते? 'ही' आहेत पाच महत्त्वाची कारणं!
EPFO चा मोठा निर्णय, आता खातेधारकांना पैसे काढणे होणार अवघड!