18 जूनला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, पण त्याआधी करावे लागणार 'हे' महत्त्वाचे काम; अन्यथा लाभ मिळणार नाही!
येत्या 18 जून रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
PM Kisan Scheme 17th Installment: देशातील साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना लवकरच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांना येत्या 18 जून रोजी या योजनेतील 17 वा हफ्ता मिळणार आहे. 18 जूनला लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणार आहेत. दरम्यान, या योजनेचा साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी एक चूक महागात पडू शकते. ई-केवायसी न केल्यास शेतकरी 2000 रुपयांच्या लाभापासून वंचित राहू शकतात. याच कारणामुळे ई-केवायसी कशी करावी, हे जाणून घेऊ या...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 2019 साली सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत तीन टप्प्यांत दिली जाते. प्रत्येक टप्प्यांत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जातात. आतापर्यंत सरकारने एकूण 16 हफ्त्यांच्या माध्यमातून सरकारला आर्थिक मदत केलेली आहे. आता 18 जून रोजी 17 वा हफ्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जाणार आहे.
तुम्ही लाभार्थी आहात की नाही, हे कसे चेक कराल?
1. या योजनेत तुम्ही लाभार्थी आहात की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला अगोदर pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला Farmer Corner या सेक्शनमध्ये जाऊन बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करावे लागेलच
3. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर किंवा रजिस्टर्ड बँक अकाऊँट डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
4. त्यानंतर तुम्हाला Get Data या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल.
5. त्यानंत पुढच्या काही सेकंदांत तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे स्क्रीनवर दिसेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी गरजेचे
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास तुमच्या बँक खात्यावर तुम्हाला 2000 रुपये मिळणार नाहीत. ही एक चूक तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. तुम्हाला घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करायची असेल तर तुम्हाला पीएम किसान मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल. फेस ऑथेंटिकेशनच्या (Face Authentication) मदतीने तुम्ही घरी बसूनच ई-केवायसी करू शकता. तसेच देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरदेखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी याआधीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची गरज नाही.
अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी
1. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोबाइलवर PM Kisan अॅप डाऊनलोड करावे लागेल.
2. अॅप Install झाल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
3. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो अॅपमध्ये टाका
4. पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया पार पाडल्यावर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.
हेही वाचा :
Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते? 'ही' आहेत पाच महत्त्वाची कारणं!
EPFO चा मोठा निर्णय, आता खातेधारकांना पैसे काढणे होणार अवघड!
SBI कडून MCLR रेटमध्ये वाढ, होम लोन, कार लोनचा हफ्ता वाढणार; सामान्यांना झटका!