एक्स्प्लोर
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्समध्ये 213 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांचा एका दिवसात 2.5 लाख कोटींचा फायदा
Share Market Update : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी आजच्या दिवसात अडीच लाख कोटींची कमाई केली.
शेअर मार्केट अपडेट
1/6

भारतीय शेअर बाजारात शुक्रवार म्हणजेच 3 ऑक्टोबरला सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 213 अंकांच्या तेजीसह 81196 अंकांवर बंद झाला. दरम्यान दिवसभरात तेजी आणि घसरणीचं चित्र कायम होतं. दुसरीकडे निफ्टी 50 मध्ये देखील 57 अंकांची वाढ झाली आहे. निफ्टी 50 निर्देशांक 24894 वर बंद झाला.
2/6

सेन्सेक्स आणि निफ्टी प्रमाणं बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 1.09 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. तर, मिडकॅप निर्देशांकात देखील तेजी पाहायला मिळाली. यामुळं गुंतवणूकदारांनी आजच्या दिवसात अडीच लाख कोटींची कमाई केली.
3/6

या आठवड्यात सर्वाधिक तेजी मेटलच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली. निफ्टी मेटल निर्देशांकात 4 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी PSU बँक निर्देशांक 2 टक्क्यांनी वाढला. याशिवाय रियल्टी, आयटी, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांकात वाढ झाली.
4/6

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 3 ऑक्टोबरला 457.76 लाख कोटींवर पोहोचलं. जे 1 ऑक्टोबरला 454.34 लाख कोटी रुपये होते.म्हणजेच बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य एका दिवसात 2.42 लाख कोटींनी वाढलं.
5/6

सेन्सेक्सवरील 30 पैकी 15 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. यात टाटा स्टील, पॉवरग्रिड, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये वाढ झाली. तर टेक महिंद्रा, मारुती सूझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 03 Oct 2025 04:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























