(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Updates : शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात, बाजारात अस्थिरतेचे संकेत
Share Marekt Updates : सकाळी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. मात्र, काही वेळेनंतर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले.
Share Marekt Updates : आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. बाजारातील व्यवहार सुरू होताच सुरुवातीचा कल तेजीचा दिसून आला. मात्र, काही वेळेतच बाजारात सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. सकाळी बाजार सुरू होताच बाजार अस्थिर असल्याचे संकेत मिळत आहेत.
आजच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स 221 अंकांच्या उसळीसह 58,217 वर उघडला. काल सेन्सेक्स 57,996 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 74 अंकांच्या वाढीनंतर 17396 वर ट्रेड होताना दिसत आहे.
सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 108 अंकांच्या घसरणीसह 57,878 अंकांवर ट्रेड करत होता. तर, निफ्टीत 10 अंकांची किंचीत घसरण असून 17, 3611 अंकावर ट्रे़ड करत आहे.
शेअर बाजारातील व्यवहाराचे सत्र सुरू होण्याआधीच SGX निफ्टी मजबूत होण्याचे संकेत देत होते. व्यवहार पुन्हा सुरू होताच, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही सुमारे 0.45 टक्क्यांनी वाढले. सकाळी 09:20 वाजता, बीएसई सेन्सेक्स 260 पेक्षा जास्त अंकांनी 58,250 अंकांच्या वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, NSE निफ्टीने 100 अंकांपेक्षा मजबूत होऊन 17,400 चा टप्पा ओलांडला होता.
प्री-ओपनिंग कशी झाली?
आज बाजार उघडण्यापूर्वी प्री-ओपन पाहिल्यास, BSE सेन्सेक्स 221.01 अंकांच्या किंवा 0.38 टक्क्यांच्या उंचीसह 58,217 वर व्यवहार करत आहे. NSE चा निफ्टी 74.30 अंकांच्या उसळीसह 17396 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
जागतिक बाजारात अजूनही गोंधळाचे वातावरण आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा तणाव काही प्रमाणात निवळल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. मात्र, अमेरिकेत व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील महागाई नियंत्रणात आली नाही तर व्याज दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे. अमेरिकेत महागाईचा दर चार दशकांच्या उच्चांकावर आहे. इंग्लंडमध्येही महागाईने लोकांना हैराण केले आहे. यामुळे बँक ऑफ इंग्लंडही फेडरलचा मार्ग स्वीकारू शकते. आगामी काळात यामुळे शेअर बाजारावर दबाव दिसून येऊ शकतो.