share market updates : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात, पण विक्रीच्या सपाट्याने सेन्सेक्स घसरला
Share Market Updates : शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. मात्र, त्यानंतर विक्री सुरू झाल्याने तेजीला लगाम लागला.
Share Market Updates : आज सकाळी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. मंगळवारी जोरदार उसळी घेतल्यानंतर बुधवारीदेखील शेअर बाजार चांगला वधारला होता. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 150 आणि निफ्टी 50 अंकांनी वधारला होता. मात्र, काही वेळेनंतर तेजीला लगाम लागला.
शेअर बाजार आज सुरुवातीच्या सत्रात निफ्टीने 17400 चा टप्पा ओलांडला. सेन्सेक्समध्ये 58,310 च्या पातळीवर बाजार उघडला. एनएसईचा निफ्टी निर्देशांक 56 अंकाने उसळला. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 58,250 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. NSE निफ्टी सुमारे 50 अंकांच्या मजबूतीसह 17,400 च्या आसपास होता.
बाजारात घसरण
काही वेळ शेअर बाजारात वधारला होता. मात्र, त्यानंतर घसरण सुरू झाली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 286 अंकानी घसरून 57,855 अंकावर व्यवहार करत होता. निफ्टीतही 64 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17288.30 वर ट्रे़ड करत होता.
तेजीची होती अपेक्षा
रशिया-युक्रेनमधील तणाव काही प्रमाणात निवळल्याने शेअर बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल असा अंदाज होता. मात्र, भारतीय शेअर बाजारात चांगली सुरुवात होऊनही विक्री सुरू झाल्याने बाजार घसरला.
मंगळवारी बाजारात तेजी
दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार मंगळवारी सावरल्याचं दिसून आलं. मंगळवारी शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1,736 अंकांनी तर निफ्टीही 509 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 3.08 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,142.05 वर पोहोचला. निफ्टीमध्ये 3.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,352.50 वर पोहोचला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Crude Price Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट; रशिया-युक्रेन तणाव कमी झाल्याचा परिणाम
- LIC IPO : एलआयसी विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी, LIC IPO अर्ज करण्याआधी 'हे' काम कराच
- 'या' पेन्शन योजनेत 4500 ची गुंतवणूक करा; 51 हजाराच्या पेन्शनसह ₹2.59 कोटी उपलब्ध होतील
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha