एक्स्प्लोर

Share Market Updates: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला

Share Market Updates:  शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. शेअर बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आला.

Share Market Updates:  शेअर बाजारात मंगळवारी दिसून आलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा असल्याने घसरणीसह आज व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात जवळपास 0.60 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 

बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्समध्ये 345.71 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीत 93.15 अंकांची घसरण होत 15,545 अंकावर खुला झाला. त्यानंतर जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 510.67 अंकांची घसरण होत 52,021.10 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 162.35 अंकांची घसरण झाली होती. निफ्टी 15,476.45  अंकांवर व्यवहार करत होता. 

आज बाजारात व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा निफ्टी 50 पैकी 13 शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, 37 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीत जवळपास 300 अंकांची घसरण झाली आहे. बँक निफ्टी 32,894.55  अंकांवर व्यवहार करत आहे. 

आज निफ्टीतील सर्व सेक्टोरियल निर्देशांकात घसरण दिसून आली आहे. सर्वाधिक घसरण मेटलमध्ये दिसून आली. मेटलमध्ये 3.05 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये 2.25 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.  ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये 1.25 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 

शेअर बाजारात आज डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअरमध्ये 1.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बजाज ऑटोमध्ये 1.24 टक्के, एचयूएलमध्ये 0.60 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये 0.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

दरम्यान, मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 934 अंकांनी वधारला होता. निफ्टी निर्देशांक 288 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 52,532 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 1.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,638 अंकांवर स्थिरावला. मंगळवारी एकूण 2428 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 819 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 125 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात

संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे

मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं

धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद

Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप

Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा

Embed widget