एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: शेअर बाजारात विक्रीच्या सपाट्याने घसरण, 'या' स्टॉक्सने सावरला बाजार

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आला. मात्र, दिवसखेर बाजार काही प्रमाणात सावरला.

Share Market Closing Bell: आज भारतीय शेअर बाजारात दिवसभर विक्रीचा दबाव दिसून आला. सकाळी घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार काही प्रमाणात सावरला. मात्र, घसरणीसह बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) 400 अंकांनी कोसळला होता. मात्र, त्यानंतर बाजार सावरला. मिडकॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बाजाराला सावरण्यास मदत झाली. बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांक आज तेजीसह बंद झाला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 69.68 अंकांच्या घसरणीसह 60,836 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30.15 अंकांच्या घसरणीसह 18,052 अंकांवर बंद झाला. 

राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी  1431 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, 1359 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

बँक निफ्टीतही विक्रीच्या दबावाने घसरण झाली होती. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने बँक निफ्टी एक टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. तर, आयटी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मेटल शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. तर, ऑटो, फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 14 कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. तर, 16 कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, टायटन, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, मारूती, एचसीएल टेक आदी कंपन्यांचे शेअर्स वधारले. 

तर, नेस्ले, आयटीसी, एल अॅण्ड टी, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, विप्रो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, पॉवरग्रीड आदी कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसून आला. 

घसरणीसह बाजाराची सुरुवात

भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात आज घसरणीसह झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 60500 अंकांखाली तर निफ्टी 18000 अंकांखाली सुरू झाला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
Embed widget