Share Market Closing Updates : शेअर बाजारावर मंदीचे सावट? सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बाजार बंद
Share Market Closing Updates : शेअर बाजारात आजही घसरण दिसून आली. बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
Share Market Closing Updates : या आठवड्यात सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आजदेखील शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली होती. मात्र, दुपारनंतर विक्रीचा जोर वाढल्याने बाजारात घसरण झाली. आज दिवसभरातील शेअर बाजाराचा व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 338 अंकांच्या घसरणीसह 57,553 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 74 अंकांच्या घसरणीसह 16,972 अंकांवर बंद झाला.
आजच्या ट्रेडिंग सत्रात फार्मा, मेटल्स, कमोडिटी, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर सेक्टरमधील शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, इन्फ्रा, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली आहे. निफ्टी 50 मधील 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 30 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 8 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 22 कंपन्यांचे शेअर दर घसरले.
इंडेक्स | किती अंकावर स्थिरावला | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 57,548.00 | 58,473.63 | 57,455.67 | -0.61% |
BSE SmallCap | 27,155.76 | 27,448.80 | 27,141.61 | 0.00 |
India VIX | 16.30 | 16.51 | 14.52 | 0.00 |
NIFTY Midcap 100 | 29,971.25 | 30,248.25 | 29,919.95 | 0.00 |
NIFTY Smallcap 100 | 9,080.15 | 9,160.65 | 9,062.00 | 0.00 |
NIfty smallcap 50 | 4,107.45 | 4,140.75 | 4,099.50 | 0.01 |
Nifty 100 | 16,825.05 | 17,044.10 | 16,795.50 | -0.37% |
Nifty 200 | 8,840.90 | 8,951.40 | 8,826.05 | -0.31% |
Nifty 50 | 16,972.15 | 17,211.35 | 16,938.90 | -0.42% |
बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत आज रुपया आणखी कमकुवत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 82.60 वर स्थिरावला.
कोणत्या शेअर दरात तेजी?
आजच्या व्यवहारात एशियन पेंट्सच्या शेअर दरात 2.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. टाटा स्टीलच्या शेअर दरात 2.07 टक्के, टायटन कंपनी 1.76 टक्के, लार्सन 1.47 टक्के, पॉवरग्रीड 1.44 टक्के, कोटक महिंद्रा 1.12 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 1.08 टक्क्यांची तेजी दिसून आली.
तर, भारती एअरटेलच्या शेअर दरात दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.85 टक्के, रिलायन्समध्ये 1.74 टक्के, एचडीएफसी बँक 1.54 टक्के, एसबीआयमध्ये 1.49 टक्के, एचयूएलमध्ये 1.48 टक्क्यांची घसरण दिसून आला आहे.
गुंतवणूकदारांचे पुन्हा नुकसान
आज शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना पुन्हा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 255.76 लाख कोटी रुपयांवर आले आहे. मंगळवारी मार्केट कॅप 256.53 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 77,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाजारातील आजची सुरुवात कशी होती?
बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत आज रुपया आणखी कमकुवत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 82.60 वर स्थिरावला.
सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्सने (Sensex) 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने 58400 चा टप्पा पार केला आहे. निफ्टी (Nifty) देखील 17200 च्या जवळ व्यवहार करत होता. आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला, NSE चा निर्देशांक निफ्टी 17,166.45 वर उघडला आणि BSE चा निर्देशांक सेन्सेक्स 58,268.54 वर उघडला.