(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेअर बाजार सावरतोय! दिवसाखेर शेअर बाजार 153 अंकांनी वधारून बंद
Share Market updates: शेअर बाजार आज दिवसाखेर बंद झाला तेव्हा 153 अंकांनी वधारला होता. आज बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून आला होता.
Share Market Updates : मागील आठवड्यातील शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर आज सोमवारी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात नफा वसुली जोरात सुरू झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, सेन्सेक्स दिवसाखेर 153 अंकांनी वधारत 57,260 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 27 अंकांनी वधारून 17,053 अंकांवर बंद झाला.
याआधी सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा किंचीत घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्समध्ये 700 आणि निफ्टीमध्ये 240 अंकापेक्षा अधिक घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. रिलायन्समधील खरेदीमुळे शेअर बाजार काही प्रमाणात सावरला असल्याचे म्हटले जाते. दिवसातील एका सत्रात सेन्सेक्स 519 आणि निफ्टी 134 अंकांनी वधारला होता. म्हणजेच दिवसाच्या निच्चांकी स्तरावरून सेन्सेक्स 1244 अंक आणि निफ्टीत 378 अंकांची तेजी दिसून आली.
शेअर बाजारात आज स्मॉल कॅप, मिड कॅपशिवाय, ऑटो, एफएमसीजी, ऊर्जा आदी क्षेत्रात घसरण दिसून आली. तर, आयटी, हेल्थकेअर क्षेत्रातील स्टॉकचे दर वधारले होते.
तेजीत असलेले शेअर्स
कोटक महिंद्रा बँकेचा शेअर 2.83 टक्क्यांनी वधारत 2019 रुपयांवर पोहचला. तर, एचसीएल टेक शेअर दरात 2.08 टक्क्यांनी वाढ झाली. एचसीएल टेकचा शेअर दर 1133 रुपयांवर पोहचला. तर, टीसीएसमध्ये एक टक्क्यांनी वाढ होऊन 2502 रुपये, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 1.20 टक्क्यांनी वाढ होऊन 2442 रुपयांवर पोहचला. बजाज फिनसर्व 1.25 टक्क्यांनी वधारून 16,890 रुपयांवर बंद झाला.
SGX निफ्टीकडून मिळाले होते चांगले संकेत
सकाळच्या वेळी, हिरव्या चिन्हात ट्रे़ड करत असलेल्या SGX निफ्टीकडून मिळणाऱ्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
शुक्रवारी मोठी पडझड
शुक्रवारचा दिवस भारतीय शेअर बाजारांसाठी ( Indian Stock Market) ब्लॅक फ्रायडे ठरला. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन समोर आल्यानंतर बाजारात मोठी पडझड दिसून आली होती. सेन्सेक्स 1687 अंकांनी घसरून 57,107 वर तर निफ्टी 510 अंकांनी घसरून 17,026 वर बंद झाला होता.