एक्स्प्लोर

Rs 2000 Currency Note Exchange: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे? घाबरू नका, आरबीआयचे निर्देश वाचा एका क्लिकवर...

Rs 2000 notes: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर घाबरू नका...आरबीआयने या नोटा बदलण्यासाठी पुरेसा अवधी दिला असून काही निर्देशही जारी केले आहेत.

Rs 2000 Currency Note Exchange: 2000 रुपयांची नोट (Rs 2000 notes) चलनातून रद्द करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतला आहे.  मात्र, 2000 रुपयांच्या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, अशा नागरिकांना आरबीआयने नोटा बदलून देण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्याशिवाय, बँकांनाही ग्राहकांना एटीएम अथवा  इतर मार्गाने 2000 रुपयांची नोट न देण्याचेही निर्देश दिले आहेत. 

ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरबीआयने या नागरिकांसाठी काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 

1. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरीक 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

2. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहे.

3. 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

4. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

5. 23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.

6. आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.

7. RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे. 

मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही 

2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 

2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली

दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती. 

इतर संबंधित बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Mahapalika : मुंबई महापालिका स्वबळावर लढणार, विजय वडेट्टीवारांची माहिती
Sachin Sawant On MNS Yuti : इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार, मनसेसोबत युती नाहीच
Congress Yuti MNS: नाशिकमध्ये युती, मुंबईत फारकत? मनसे-काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय?
Political Yuti: मुंबईत काँग्रेसचं एकला चलो रे, नाशिकमध्ये मनसेसोबत आघाडी?
MNS Yuit Politics: काँग्रेसमध्ये मनसेवरून दोन गट, आघाडीवरून नेत्यांमध्येच संभ्रम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
Embed widget