RBI Sell Dollars : भारतातील अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी RBI ने विकले 2 अब्ज डॉलर्स, जाणून घ्या का?
RBI Sell Dollars : जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ, यामुळे जागतिक अर्थव्यवस्था दबावाखाली आहे.
RBI Sell Dollars : रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) परिणाम संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. भारतीय चलनावर देखील याचा मोठा परिणाम जाणवतो. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) ने मोठा निर्णय घेतला आहे,
आरबीआयने डॉलर्स विकले
जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ, यामुळे जागतिक अर्थव्यवस्था दबावाखाली आहे. भारतातील अर्थव्यवस्था मजबूत राहावी यासाठी आरबीआयने डॉलर विकण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून आयात करणाऱ्या कंपन्यांना महागडे डॉलर खरेदी करावे लागणार नाहीत. कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल $115 हा आठ वर्षांचा उच्चांक ओलांडला आहे. कच्च्या तेलाच्या महागाईमुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा आरबीआय डॉलर विकते. तेव्हा ते रुपये खरेदी करते. त्यामुळे वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता येईल आपल्या परकीय चलन निधीतून 2 अब्ज डॉलर्स विकले आहेत.
महागड्या डॉलरचा काय परिणाम होईल?
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा इंधन वापरणारा देश आहे. ज्याची 80 टक्के आयात केली जाते. सरकारी तेल कंपन्या डॉलरमध्ये पैसे देऊन कच्चे तेल खरेदी करतात.
-जर डॉलर महाग झाला आणि रुपया स्वस्त झाला तर त्यांना डॉलर घेण्यासाठी आणखी रुपये मोजावे लागतील. यामुळे आयात महाग होणार असून सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
-भारतातील लाखो मुले परदेशात शिकत आहेत. ज्यांचे पालक फी पासून ते राहण्याचा खर्च भरत आहेत. ज्यांचा अभ्यास आणखी महाग होईल. कारण पालकांना जास्त पैसे देऊन डॉलर्स विकत घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांना महागाईचा झटका बसणार आहे.
-खाद्यतेल आधीच महाग आहे, जे आयातीद्वारे पूर्ण केले जात आहे. डॉलर महाग झाल्यास खाद्यतेलाची आयात आणखी महाग होईल.
-परदेश प्रवास महाग होईल. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांना डॉलर खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील, ज्याचा महागाईमुळे त्यांच्यावर परिणाम होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ukraine Russia War : युक्रेनमध्ये उतरू शकत नाही विमान, नवीन शेखरप्पाचं पार्थिव खारकिव्हमधून भारतात कसं आणणार?
- Russia Ukraine War: जेवणासाठी घराबाहेर पडला अन् घात झाला.... रशियन बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
- Russia Ukraine War: युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पंजाबमधील विद्यार्थ्याला पक्षाघाताचा झटका
- Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य