एक्स्प्लोर

Gold Reserve : RBI कडून वर्षभरात 65 टन सोनं खरेदी, जाणून घ्या कारण

RBI Gold Reserve Deposits: रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात आरबीआयने 65 टन सोनं खरेदी केले आहे.

RBI Gold Reserve Deposits: वाढती महागाई आणि शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या काळात अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. मागील एक वर्षभरात देशातची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेने आपली सोनं खरेदी दुप्पट केली आहे. वर्ष 2021-22 या वर्षात रिझर्व्ह बँकेने 65 टन सोन्याची खरेदी केली आहे. आता आरबीआयकडे सोन्याचा साठा वाढला असून 760.42 टन इतका झाला आहे. मागील दोन वर्षात आरबीआयने 100 टन सोनं खरेदी केली आहे. 

जागतिक पातळीवर सुरू असलेला तणाव आणि जागतिक बाजारात ( Global Financial Market) सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमींवर चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी रिझर्व्ह बँकेने सोनं खरेदी केली असल्याचे म्हटले जात आहे. जून 2020 ते मार्च 2021 या दरम्यान रिझर्व्ह बँकेने 33.9 टन सोने खरेदी केली होती. मात्र, 2021-2022 मध्ये आरबीआयने दुप्पट म्हणजे 65 टन सोने खरेदी केले होते. 

3.22  लाख कोटी रुपयांचे सोने

आरबीआयच्या गोल्ड होल्डिंगचे मूल्य 30 टक्क्यांनी वाढून 3.22 लाख कोटी रुपये झाले आहेत. यातील 1.25 लाख कोटी रुपयांचे सोनं हे आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंट अॅण्ड गोल्ड जवळ आहे. यामध्ये गोल्ड डिपॉझिटचाही समावेश आहे. तर, 1.97 लाख कोटी रुपयांचे सोनं  बँकिंग डिपार्टमेंटमध्ये मालमत्ता म्हणून ठेवण्यात आले आहे. आरबीआयनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी उसळण आणि अतिरिक्त सोनं खरेदी केल्याने आरबीआयकडील सोन्याच्या मूल्यात वाढ झाली आहे. त्याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे. 

आरबीआयकडे सोन्याचा किती साठा?

आरबीआयच्या मालमत्तेत 28.22 टक्के परदेशी चलनाचा समावेश आहे. तर, 71.78 टक्के सोनं आहे. आरबीआयकडे 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 760.42 टन सोनं होते. यामध्ये 453.52 टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, 295.82 टन सोने भारतात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget