(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakesh Biyani Resigns: फ्यूचर ग्रुपमध्ये मोठी घडामोड; राकेश बियाणींचा फ्यूचर रिटेलमधून राजीनामा
Rakesh Biyani Resigns: फ्यूचर रिटेलचे व्यवस्थापकीय संचालक राकेश बियाणी यांनी राजीनामा दिला आहे.
Rakesh Biyani Resigns: फ्यूचर रिटेल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश बियाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फ्यूचर ग्रुपसमोर आधीच अडचणी असताना आता राकेश बियाणी यांनी राजीनामा दिला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलसमोर फ्युचर ग्रुपची फ्लॅगशिप फर्म असलेल्या फ्यूचर रिटेलला दिवाळखोरीच्या याचिकेचा सामना करावा लागत आहे. रिलायन्सने फ्यूचर रिटेलसोबतचा 24,713 कोटींचा करार रद्द केला. त्यानंतर फ्यूचर रिटेलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आहे.
राकेश बियाणी यांची 2 मे 2019 रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालकपदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. 1 मे 2022 रोजी त्यांच्या कार्यकाळाची मुदत संपली. त्यांनी या पदासाठी पुनर्नियुक्ती मागितली नसल्याने त्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली नसल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
त्याशिवाय, बियाणी हे कंपनीच्या संबंधित संचालक मंडळावर सदस्य होते. या संचालक मंडळावरील सदस्यत्व त्यांनी सोडले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
त्याशिवाय फ्युचर रिटेल लिमिटेडचे कंपनी सेक्रेटरी विरेंद्र समानी यांनीदेखील पदाचा राजीनामा दिला आहे. भविष्यातील इतर चांगल्या संधीसाठी त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने त्यांचा राजीनाम स्वीकारला असून 30 एप्रिल 2022 पासून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
फ्यूचर ग्रुपमध्ये Future Supply Chain Solutions, Future Retail, Future Lifestyle Fashions, Future Consumer आणि Future Enterprises या कंपन्यांचा समावेश आहे. रिलायन्स कंपनीने फ्यूचर कंपनीसोबत
अधिग्रहणाच्या मुद्यावरून फ्यूचर रिटेल, रिलायन्स आणि अॅमेझॉन या तीन कंपन्यांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. अॅमेझॉनने फ्यूचर रिटेल आणि रिलायन्सच्या कराराला विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडताना फ्यूचर ग्रुपने 1400 कोटींच्या करारासाठी अॅमेझॉनने 26 हजार कोटींची कंपनी उद्धवस्त केली असल्याचा आरोप केला होता. अॅमेझॉनने त्याआधी फ्युचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजवर फसवणुकीचा आरोप लावला. त्यासाठी अॅमेझॉनने वृत्तपत्रांद्वारे जाहिरातीदेखील छापल्या होत्या.