Income Tax : 136 कोटी लोकसंख्येच्या देशात किती लोक प्राप्तीकर भरतात? सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
Income Tax Payers Update: देशातील किती लोकांनी आयकर भरला असा प्रश्न राज्यसभेत विचारला गेला होता.
नवी दिल्ली: आपल्या देशाची लोकसंख्या ही 136 कोटींवर गेल्याचं आकडेवारी सांगतेय. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? सन 2010-20 या आर्थिक वर्षामध्ये देशातील 8.13 कोटी लोकांनी आयकर भरल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत माहिती दिली आहे.
राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये देशातील 8 कोटी 13 लाख 22 हजार 263 लोकांनी आयकर भरला आहे. यामध्ये वैयक्तिक, हिंदू अविभाजित परिवार, संस्था, फर्म, लोकल ऑथोरिटी, आर्टिफिशिअल ज्युडिशिअल पर्सन यांचा समावेश आहे. या लोकांनी आयकर भरला आहे तसेच इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केली आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीमध्ये आयकर तसेच कंपनी कराचाही समावेश आहे. तसेच यामध्ये अशाही लोकांचा समावेश आहे ज्यांचा टीडीएस कट झाला आहे पण त्यांनी आयकर भरला नाही किंवा रिटर्न फाईल केली नाही.
अधिकाधिक लोकांना आयकराच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकारने इनकम आणि ट्रान्सअॅक्शनच्या मदतीने प्रोजेक्ट इनसाईट लॉन्च केलं आहे. या प्रोजेक्टचे लक्ष हे तीन मुद्द्यांवर असेल. त्यामध्ये स्वत:हून नियमांचे पालन करणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई आणि लोकांना कर देण्यास प्रोत्साहन देणे हा यामागचा हेतू आहे.
असा भरा आयकर रिटर्न
- आयकर ई-पोर्टलला भेट द्या
- होमपेजवर ‘login here’पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा PAN Card क्रमांक ‘enter your user ID’ या पर्यायामध्ये नमूद करा आणि continue वर क्लिक करा
- ‘secure access message’ वर continue करा
- आता तुम्हाला सहा अंकी वन-टाइम पासवर्ड (OTP) हा एसएमएस किंवा व्हॉइस कॉलद्वारे प्राप्त करायचा आहे, याची निवड करा
- पर्याय निवडल्यानंतर Enter पर्यायावर क्लिक करा
- आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी व्यक्ती त्यांचा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा नेट बँकिंग देखील वापरू शकतात.
- आधार पर्याय वापरताना, आधार क्रमांक तसेच प्राप्त झालेला ओटीपी नमूद करावा लागेल.
- नेट बँकिंगद्वारे युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करावा लागेल.
- लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या आयटी रिटर्नवर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचा वापर करा.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha