एक्स्प्लोर

Rule Change: PPF योजनेत तीन नवे नियम; 1 ऑक्टोबरपासून बदल लागू, 'या' खात्यांवर मिळणार नाही व्याज

पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स अंतर्गत चालवली जाणारी पब्लिक प्रोविडेंड फंड (PPF)  या योजनेबाबत अर्थ मंत्रालयाकडून एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे.

Public Providend Fund: नवी दिल्ली : गुंतवणूक करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण उत्तम स्कीमच्या शोधात असतो. अशातच गुंतवणुकीसाठी जोखीम नसलेल्या उत्तम सरकारी योजना कुणाला नको असतात. त्यापैकीच एक म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स अंतर्गत पब्लिक प्रोविडंड फंड (PPF) योजना. या योजनेत आता तीन महत्त्वाचे आणि मोठे बदल केले जाणार आहेत. हे बदल 1 ऑक्टोबर 2024 पासून म्हणजेच, पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत. 

पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स अंतर्गत चालवली जाणारी पब्लिक प्रोविडेंड फंड (PPF)  या योजनेबाबत अर्थ मंत्रालयाकडून एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे. ही एक अशी योजना आहे, जी 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते आणि दीर्घ मुदतीत तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. जाणून घेऊया या योजनेत कोणते बदल होणार आहेत?

21 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागानं नव्या नियमांबाबत मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत, ज्या अंतर्गत PPF चे तीन नवे नियम लागू केले जातील. याशिवाय सुकन्या समृद्धी योजना आणि NSC च्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, अल्पवयीन ते अनिवासी भारतीयांपर्यंत तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनियमित खात्यांचे नियमितीकरण तपशीलवार स्पष्ट केले आहेत.

पहिला नियम : अल्पवयीन व्यक्तीच्या नावं PPF खातं उघडता येणार  

एखादी व्यक्ती जर अल्पवयीन असेल, तरीदेखील त्यांच्या नावानं पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेसाठी खातं उघडता येणार आहे. म्हणजेच, खातं उघडल्यानंतर PPF व्याज व्यक्ती 18 वर्षांची होईपर्यंत दिलं जाईल. ज्या तारखेला अल्पवयीन व्यक्ती प्रौढ होईल, त्या तारखेपासून मॅच्युरिटी कालावधी मोजला जाईल. म्हणजेच, ज्या तारखेपासून व्यक्ती खातं उघडण्यास पात्र होते, त्या दिवसापासून मॅच्युरिटीचा कालावधी गणला जाणार. 

दुसरा नियम : एकापेक्षा जास्त PPF अकाउंट 

जर जमा केलेली रक्कम प्रत्येक वर्षासाठी लागू असलेल्या कमाल मर्यादेत असेल, तर प्रायमरी अकाउंटवर योजनेनुसार, व्याज आकारलं जाईल. जर प्राथमिक खातं दरवर्षी अंदाजे गुंतवणूक मर्यादेत राहीलं, तर दुसऱ्या खात्यातील शिल्लक पहिल्या खात्यात विलीन केली जाईल. विलीनीकरणानंतर, प्रायमरी अकाउंट वर प्रचलित योजना दर किंवा व्याज दर मिळत राहणार. विलीनीकरणानंतर, प्रायमरी अकाउंटवर प्रचलित योजना दर किंवा व्याज खात्यावर मिळत राहणार. प्राथमिक आणि दुय्यम खात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अतिरिक्त खात्यावर खातं उघडण्याच्या तारखेपासून शून्य टक्के व्याजदर मिळेल. याचा अर्थ एकापेक्षा जास्त खाती उघडली तरी पीपीएफ योजनेंतर्गत व्याज एकाच खात्यावर मिळेल. 

तिसरा नियम : NRI द्वारे PPF खात्याचा विस्तार 

PPF, 1968 अंतर्गत फक्त सक्रिय NRI PPF खाती उघडली जातात, जिथे खातेदाराची निवासी स्थिती फॉर्म H मध्ये विशेषतः विचारली जात नाही. अकाउंट होल्डर्स (भारतीय नागरिक जे खाते उघडण्याच्या कालावधीत NRI झाले आहेत) यांना POSA दरानं 30 सप्टेंबर 2024 पर्यंत व्याज दिलं जाईल. यानंतर 1 ऑक्टोबरपासून या खात्यांवर शून्य व्याजदर लागू होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, 'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब

व्हिडीओ

2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, 'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Embed widget