Post office Savings : पोस्ट ऑफीसमधल्या 'या' योजनेत अधिक फायदे, चांगला व्याजदर आणि करात सूटही मिळतेय
Post office Savings : तुम्हीही पोस्टात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर 'ही' योजना तुम्हाला अधिक फायदे मिळवून देईल.
Post office Savings : आम्ही तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये पैसे कमावण्याची सर्वोत्तम योजनेची माहिती देणार आहोत. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळतील. या योजनेचे नाव आहे नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट, ज्यामध्ये तुम्ही 1000 रुपये गुंतवले तर तुम्हाला रिटर्नसह 1389.49 रुपये मिळतील. या योजनेतून मिळणाऱ्या कर सवलतींसह या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
ही भारत सरकारची एक छोटी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही पैसेही गुंतवू शकता. सध्या एनएससीमध्ये गुंतवणुकीवर 6.8 टक्के व्याज दिलं जातं. या गुंतवणूक योजनेला पाच वर्षांचा लॉक-इन आहे. यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळतो. एवढेच नाही तर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्समधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर सवलतीचा लाभ ही घेऊ शकतो. यामध्ये गुंतवणुकीच्या वेळी व्याजदर संपूर्ण मॅच्युरिटी कालावधीसाठी समान राहतो.
किमान गुंतवणूक रु 1000
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. शिवाय गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. यामध्ये दरवर्षी गुंतवणूकदाराला व्याज दिले जात नाही, तर ते जमा होते. यामध्ये तुम्ही 100 च्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता.
आयकर सवलत (Income Tax Relief)
एनएससी (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स) मधील गुंतवणुकीवर आयकर कलम 80सी अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट मिळू शकते. करपात्र उत्पन्नाच्या बाबतीत, एकूण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते. आयकराच्या बाबतीत, एनएससीवर दरवर्षी मिळणारे व्याज हे गुंतवणूकदाराने पुनर्गुंतवणूक म्हणून मानले जाते आणि तो 1.5 लाखांच्या एकूण मर्यादेत कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरतो.
एनएससीच्या आधारे कर्ज घेता येते
जर तुम्ही एनएससीमध्ये गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम मॅच्युरिटीच्या पाचव्या वर्षी किंवा शेवटच्या वर्षी पुन्हा गुंतवता येणार नाही. अंतिम वर्षात, एनएससी(राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे) कडून मिळालेली व्याजाची रक्कम प्रमाणपत्र धारकाच्या उत्पन्नात जोडली जाते आणि त्यानुसार कर लागू होतो. तुम्ही एनएससीच्या आधारे कर्ज घेऊ शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत घसरण, महागाई होणार आणखीन वाढ
- GST: महागाईच्या झळा वाढणार! जीएसटी कर वाढण्याचे संकेत, असे असतील नवे दर?
- Gold-Silver Price Today : सोन्याचा भाव आज 54 हजारांवर, युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha