Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
Satish Wagh Murder Case Update: मांजरी ते यवत या प्रवासादरम्यानच वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. दरम्यान त्यांचा खून का केला याचा तपास सुरू आहे.
पुणे: पुण्यातील विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे काल (सोमवारी) अपहरण करून खून करण्यात आला. सतीश वाघ यांचं काल (सोमवारी) पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. आरोपी कोण होते? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण का केलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराचं पुण्यासारख्या शहरातून अशा प्रकारे अपहरण करून खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे, याबाबत पोलिसांची पथकं तपास करत आहेत. सतीश वाघ यांचे कोणाशी भांडण किंवा काही वैर होतं का याचा देखील तपास सुरू आहे.(Satish Wagh Murder Case Update)
कोण होते सतीश वाघ?
सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. सतीश वाघ हे शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांची शेती आहे, त्यांचा व्यवसाय देखील आहे. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झालं होतं. (Satish Wagh Murder Case Update)
पुण्यापासून सुमारे 34 किलोमीटरवर असलेल्या उरुळी कांचनच्या पुढे शिंदवणे घाटात त्यांचा हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. मांजरी ते यवत या प्रवासादरम्यानच वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. दरम्यान त्यांचा खून का केला याचा तपास सुरू आहे. त्यांचं कोणाशी काही वैर आहे का किंवा कोणाशी वाद झाला का यावरून देखील तपास सुरू आहे. (Satish Wagh Murder Case Update)
मांजरी - फुरसुंगी रस्त्यावर वाघ यांची हॉटेल आणि दुकाने भाड्याने
सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहतात. सतीश वाघ हे त्यांची वडिलोपार्जित शेती करतात. त्यांची मांजरी - फुरसुंगी रस्त्यावर हॉटेल आणि दुकाने भाड्याने आहेत. त्यांचे कोणाशीही वैर नव्हते किंवा भांडणे नव्हती अशी माहिती आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती
या घटनेचा कसून तपास सुरू आहे. काही लोकांना तपासासाठी आम्ही ताब्यात सुद्धा घेतलं आहे. या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी एकूण 16 टीम्स तयार करण्यात आले आहेत. सहा क्राइम ब्रांचच्या टीम सुद्धा यात सहभागी आहेत. CP स्वतः या संपूर्ण घटनेकडे बारीक केली लक्ष ठेवून आहेत. काही सीसीटीव्ही फुटेज देखील आम्हाला मिळाले आहेत. संपूर्ण घटनेचे गांभीर्य ओळखत काही गोपनीयता पाळणं गरजेचं आहे. लवकरच आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू आणि त्यांना अटक करू, अशा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
टिळेकारांची प्रतिक्रिया काय?
या घटनेबाबत आमदार योगेश टिळेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "काल या जागेवरून सकाळी अपहरण झालं आणि खून झाला. पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. लवकरात लवकर पोलीस याचा सुगवा लावतील. आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे, मला आशा आहे पोलीस आरोपींना लवकरात लवकर शोधून काढतील. खुनाचं कारण काय आहे, आणि ही घटना का घडली हे शोधतील. मी, माझी आई आणि आमचा सर्व परिवार मोठ्या धक्क्यात आहे. पोलिस चांगलं सहकार्य करत आहेत. सर्व यत्रंणा कामाला लागली आहे. आम्हाला आशा आहे गुन्हेगारांना लवकरच अटक होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल. या घटनेत राजकारण न करता पोलीस आपलं काम करतील सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा असो शेवटी ही यंत्रणा आहे. सामान्य नागरिक याच्यावर अन्याय झाला तरी राज्य सरकार चांगलं काम करेल करते.मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी फोन केले आहेत, माझ्या कुटुंबीयांच्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत.', असं योगेश टिळेकरांनी म्हटलं आहे. (Satish Wagh Case Update)
काय आहे अपहरण आणि हत्येमागचं कारण?
सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. ती शेती सतीश वाघ करतात. या शेतातील एक एकराबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे, दाखल फिर्यादीत नमूद केल्यानुसार सतीश वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते व पैसे परत मिळत नसल्याने वडील (सतीश वाघ) हे वारंवार कॉल करत असल्याचे ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. किंवा या व्यतिरिक्त अन्य कोणतं वैयक्तिक कारण आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. पुण्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.