Gold-Silver Price Today : सोन्याचा भाव आज 54 हजारांवर, युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम
Gold-Silver Price Today : युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होताना दिसत आहे. सोन्याचा भाव आज 54 हजारांवर पोहोचला आहे.
Gold-Silver Price Today : युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होताना दिसत आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवहारावर तर होतोच आहे. परंतु, भारतीय बाजारपेठेवरही या युद्धाचे पडसाद उमटताना दिसतायत. याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. सोन्याचा भाव आज 54 हजारांवर पोहोचला आहे. युक्रेन रशिया युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या दरात कमालीची घट झाली होती. युद्धाआधी सोन्याचा प्रति तोळा भाव 48 हजारांच्या जवळपास होता. आता 24 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजारांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,400 इतका आहे. मागील 12 दिवसात सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत. युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले तर सोन्याचा भाव 58 हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी कोरोनाच्या काळात सोन्याचा भाव 58 हजारांपर्यत गेला होता.
MCX माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, 28 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 50,760 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो 4 मार्च रोजी व्यापाराच्या शेवटीच्या दिवशी 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 1789 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत सुमारे दोन हजार रुपयांनी वाढली आहे. चांदीचे दर मात्र कालच्या एवढाच आहे. चांदीचा भाव 70,700 एक किलोग्रॅम आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मे 2021 पासून सोन्याच्या किमतीतील ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील जोखीम भावना वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करत आहेत. त्याच्या सुरक्षिततेमुळे सोन्यातही गुंतवणूक वाढत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Google Maps : नेव्हिगेशनसाठी इंटरनेटची गरज नाही, अशा प्रकारे ऑफलाइन मोडमध्ये Google Maps
- UP Assembly Election : उत्तर प्रदेशमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान, 54 जागांवर 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
- ITA Awards मध्ये 'एबीपी'ची बाजी, सर्वाधिक लोकप्रिय हिंदी वृत्तवाहिनीसाठी पुरस्कार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha