![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारी योजना, फसवणुकीचा धोका नाही, 'या' योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा!
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास ते सुरक्षित राहण्याची हमी आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही ठेवलेल्या पैशांवर व्याज दिले जाते. त्यामुळे तुम्ही ठेवलेल्या ठेवीवर चांगला परतावा मिळतो.
![सरकारी योजना, फसवणुकीचा धोका नाही, 'या' योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा! post office rd scheme will give you good returns know all information in marathi सरकारी योजना, फसवणुकीचा धोका नाही, 'या' योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/20/f40f78fe15a202d597d056807d4cfc0b1713624120123988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : स्वत:कडे असलेले पैसे गुंतवून त्याचे मूल्य आणखी वाढवण्यासाठी लोक शेअर मार्केट (Share Market), म्यूच्यूअल फंड (Mutual Fund) यांचा आधार घेतात. मात्र अशा प्रकारे केलेल्या गुंतवणुकीला जोखीमही असते. त्यामुळे तुम्हाला कोणताही धोका न पत्करता चांगल्या परताव्याची हमी पाहिजे असेल, तर सरकारच्या वेगवेगळ्या योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेची माहिती देणार आहोत.
पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना
ही एक पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. (Post Office Saving Scheme) आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही ठेवलेल्या ठेवींवर थेट 80,000 रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी पैसे भरण्याची गरज नाही. तुमच्या पगारातून उरलेले पैसे तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेच्या अंतर्गत तुम्ही जमा केलेल्या पैशांवर वर्षाला सध्या 6.7 टक्के व्याज मिळते. या योजनेअंतर्गत कोणताही नागरिक पैसे गुंतवून फायदा मिळवू शकतो. या योजनेची मॅच्यूरिटी ही पाच वर्षे आहे.
छोट्या मुलीच्या नावावरही खोलू शकता खातं
या योजनेत प्रत्येक महिन्याला पैसे गुंतवता येतात. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही गुंतवलेले पैसे बुडण्याचाही धोका नाही. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 100 रुपये गुंतवावे लागतात. जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यावर या योजनेत कोणतेही बंधन नाही. अल्पवयीन मुलांच्या नावावरही या योजनेअंतर्गत खातं खोलता येतं. अशा स्थितीत आई-वडिलांची कागदपत्रे जमा करावी लागतात.
80 हजार रुपयांचं व्याज कसं मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये (Post Office RD) तुम्ही 7000 प्रतिमहिना गुंतवल्यास पाच वर्षांत तुमचे एकूण 4,20,000 रुपये जमा होतात. पाच वर्षांत मॅच्यूरिटी झाल्यावर तुम्हाला तुम्ही जमा केलेल्या पैशांवर 79,564 रुपये व्याज मिळते. म्हणजेच पाच वर्षांत तुम्हाला 4,99,564 रुपये मिळतात. तुम्ही प्रतिमहिना पाच हजार रुपयांची आरडी केल्यास एका वर्षात तुमचे एकूण 60,000 रुपये जमा होतात. पाच वर्षांत तुम्ही जमा केलेली रक्कम 3 लाख रुपये होते. त्यावर तुम्हाला 6.7 टक्के व्याज मिळते. म्हणजेच तुम्ही जमा केलेल्या तीन लाख रुपयांवर पाच वर्षांत तुम्हाला 56,830 रुपये व्याज मिळते. पाच वर्षांनंतर तुम्हाला एकूण 3,56,830 रुपये मिळतात.
टीडीएस कापला जाणार
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीमअंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जातो. आरटीआय भरल्यावर तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला हा टीडीएस परत दिला जातो. या व्याजावर 10 टक्के टीडीएस लागू होतो. तुम्ही जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल तर टीडीएस कापला जाईल.
हेही वाचा :
...तर तुम्हीही झाले असते करोडपती, चार वर्षांत 'या' कंपनीनं अनेकांना केलं मालामाल!
मुकेश अंबानींच्या नव्या कोऱ्या कंपनीचा बोलबाला, वर्षात कमवाला तब्बल 310 कोटींचा नफा!
तयारीला लागा! लवकरच येणार 'या' कंपनीचा आयपीओ, भरघोस पैसे कमवण्याची नामी संधी!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)