(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या नव्या कोऱ्या कंपनीचा बोलबाला, वर्षात कमवाला तब्बल 310 कोटींचा नफा!
मुकेश अंबानी यांच्या या नव्या कंपनीने गेल्या तीन महिन्यांतच छ्प्परफाड कमाई केली आहे. ही कंपनी येणाऱ्या काळात आपला विस्तार करणार आहे.
मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा रिलायन्स उद्योग (Reliance Group) समूहाचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. या उद्योग समूहातील प्रत्येक कंपनी चांगली नफा मिळवताना दिसतेय. अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (जेएफएस) या नव्या कंपनीनेही तगडी कमाई केली आहे. ही कंपनी शेअर बाजारावर सूचीबद्ध हो ऊन अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. असे असताना या कंपनीने थेट 310 कोटी रुपयांचा नफा मिळवलेला आहे. मुकेश अंबानी यांचा शुक्रवारी (19 एप्रिल) वाढदिवस होता. वाढदिवशीच अंबानी यांना या कंपनीने ही गोड बामती दिली आहे.
फक्त व्याजातून कमवले 280 कोटी रुपये
शुक्रवारी जिओ फायनान्शियल या कंपनीने वित्तीय वर्ष 2023-24 सालातील जानेवारी-मार्चचा आपला तिमाही निकाल जारी केला. या तिमाहीच्या निकालानुसार या कंपनीने तीन महिन्यांत एूण 310 कोटी रुपयांचा नफा मिळवलेला आहे. या कंपनीने तीन महिन्यांत फक्त व्याजाच्या माध्यमातून 280 कोटी रुपये कमवले आहेत. या कंपनीने गेल्या तीन महिन्यांत भरघोस नफा मिळवलेला असला तरी तिमाहीच्या निकालानंतर मात्र भांडवली बाजारात या कंपनीच्या समभागात बीएसईवर 2.17 टक्के पडझड झालेली पाहाला मिळाली. दिवसाअखेर या कंपनीच्या शेअरचे मूल्य 370 रुपये होते.
याआधीच्या तिमाहित काय स्थिती होती?
जेएफएस या कंपनीला याआधीच्या तिमाहितही (2023 ऑक्टोबर-डिसेंबर) मोठा नफा झाला होता. या कंपनीने याआधीच्या तिमाहित 293 रुपयांचा नफा मिळवला होता. या तिमाहीत कंपनीने फक्त व्याजातून 269 कोटी रुपये कमवले होते. या कंपनीचे एकूण उत्पादन 413 रुपये होते.
ऑगस्ट महिन्यात कंपनी झाली होती सूचिबद्ध
रिलायन्स ग्रूपची जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस ही कंपनी अगस्त 2023 मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाली होती. या कंपनीच्या माध्यमातून रिलायन्स उद्योग समूहाने फायनॅन्शियल क्षेत्रात प्रवेश केला होता. हीच कंपनी आता इन्शुरन्स सेक्टरमध्येही प्रवेश करणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! एलॉन मस्क यांची भारत भेट लांबणीवर, करणार होते कोट्यवधीच्या गुंतवणुकीची घोषणा!
तयारीला लागा! लवकरच येणार 'या' कंपनीचा आयपीओ, भरघोस पैसे कमवण्याची नामी संधी!
लग्न, कर्जफेड ते वैद्यकीय उपचार, PF खात्यातील पैसे नेमके कधी काढता येतात? जाणून घ्या नियम आणि अटी!