(Source: Poll of Polls)
...तर तुम्हीही झाले असते करोडपती, चार वर्षांत 'या' कंपनीनं अनेकांना केलं मालामाल!
या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. चार वर्षांपूर्वी तुम्ही या कंपनीत पैसे गुंतवले असते तर कदाचित आज तुम्हीदेखील कोट्यधीश असता.
मुंबई : शेअर बाजाराचे (Share Market) अचूक आणि सखोल ज्ञान असेल तर या माध्यमातून भरपूर पैसे कमवता येऊ शकतात. योग्य कंपनीत गुंतवणूक करून तुम्हीदेखील चांगले रिटर्न्स मिळवू शकता. भांडवली बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. सध्या अशाच एका कंपनीची चर्चा होत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चार वर्षांत तब्बल 98.17 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीने अनेकांना मालामाल केलंय.
चार वर्षांत नफा 98.17 टक्क्यांनी वाढला
गेल्या चार वर्षांपासून तगडे रिटर्न्स देणाऱ्या या कंपनीचे नाव टिन्ना रबर असे आहे. या कंपनीच्या समभागाचे चार वर्षांपूर्वी 8 रुपये मूल्य होते. आज याच समभागाचे मूल्य थेट 800 रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. म्हणजेच चार वर्षांत या कंपनीचा शेअर थेट 98.17 टक्क्यांनी वाढला आहे. 30 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचा शेअर 8.45 रुपये होता. आता हा शेअर आज 838 रुपये झाला आहे. एका वर्षाचा हिशोब करायचा झाल्यास या कंपनीने गुंतवणूकदारांना चार पट रिटर्न्स दिले आहेत.
...तर तुम्हीही झाले असते चार वर्षांत कोट्यधीश
या कंपनीने आतापर्यंत आपल्या समभागधारकांना बऱ्यापैकी रिटर्न्स दिले आहेत. चार वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज याच पैशांची किंमत ही जवळपास 1 कोटी रुपये असती. एका वर्षापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आज 4 लाख रुपये असते
सहा महिन्यांत दिले एवढे रिटर्न्स
टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Tinna Rubber Infrastructure Ltd) चालू वर्षात आतापर्यंत 45.92 टक्के रिटर्न्स दिले आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीत या कंपनीने 93.04 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीच्या शेअरच्या मूल्यात शुक्रवारीदेखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. हे मूल्य 2.60 टक्क्यांनी वाढून 838 रुपये प्रति शेयरपर्यंत पोहोचले. या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यातील सर्वाधिक मूल्य 846 रुपये तर 52 आठवड्यातील सर्वांत कमी मूल्य 192.65 रुपये आहे.
टिन्ना रबर कंपनी काय करते?
टिन्ना रबर ही कंपनी 40 वर्षांपूर्वीची आहे. ही एक रिसायकल कंपनी आहे. या कंपनीकडून खराब झालेल्या टायर्सना रिसायकल करून त्यापासून नवे प्रोडक्ट तयार केले जाते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीचे देशभरात एकूण 5 प्लान्ट आहेत.
(टीप-या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हाच आहे. आम्ही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करायची असल्यास, या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मोठी बातमी! एलॉन मस्क यांची भारत भेट लांबणीवर, करणार होते कोट्यवधीच्या गुंतवणुकीची घोषणा!
तयारीला लागा! लवकरच येणार 'या' कंपनीचा आयपीओ, भरघोस पैसे कमवण्याची नामी संधी!
मुकेश अंबानींच्या नव्या कोऱ्या कंपनीचा बोलबाला, वर्षात कमवाला तब्बल 310 कोटींचा नफा!