एकदाच गुंतवणूक करा, दरमहा 9 हजार 250 रुपये मिळा, नेमकी काय आहे पोस्ट ऑफिसची योजना?
जर तुम्ही शेअर बाजाराच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त असाल आणि कोणत्याही जोखीमशिवाय खात्रीशीर परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या काही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात

Post Office Scheme News : जर तुम्ही शेअर बाजाराच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त असाल आणि कोणत्याही जोखीमशिवाय खात्रीशीर परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या काही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक हमी परतावा योजना देशभरातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS). ही योजना तुम्ही लग्नानंतर तुमच्या कुटुंबासह घेऊ शकता. या योजनेत एकदा पैसे गुंतवून केले की तुम्ही दरमहा दीर्घकाळ चांगली रक्कम कमवू शकता.
तुम्ही मुलांच्या नावाने खाते उघडू शकता
तुम्ही ही योजना तुमच्या 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावाने देखील उघडू शकता. यातून दरमहा मिळणारे व्याज मुलाच्या शाळेच्या फी किंवा इतर खर्चासाठी वापरले जाऊ शकते. लग्नानंतर मजबूत आर्थिक योजना बनवू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी देखील ही योजना चांगली आहे.
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना काय?
इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, तुम्ही फक्त 1000 रुपयांनी POMIS मध्ये खाते उघडू शकता. यात एकल आणि संयुक्त दोन्ही खात्यांची सुविधा आहे. एका खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकता, तर संयुक्त खात्यात ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये दरमहा व्याज दिले जाते. सध्या या योजनेवर 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेची मुदत 5 वर्षे आहे, जी तुम्ही इच्छित असल्यास आणखी 5 वर्षे वाढवू शकता.
POMIS योजना कशी कार्य करते?
या योजनेत, मिळणारे वार्षिक व्याज 12 भागांमध्ये विभागले जाते आणि दरमहा तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जाते. जर तुम्ही मासिक व्याज काढले नाही, तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा होत राहील. मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला तुमचे संपूर्ण मुद्दल देखील परत मिळेल.
तुम्हाला दरमहा किती कमाई होईल?
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडून 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सुमारे 1 लाख 11 हजार रुपये वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा सुमारे 9250 रुपये निश्चित उत्पन्न मिळेल. जर तुम्ही एकाच खात्यात 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सुमारे 66600 रुपये वार्षिक व्याज आणि दरमहा सुमारे 5550 रुपये उत्पन्न मिळेल. विशेष म्हणजे यामध्ये कोणताही धोका नाही आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
महत्वाच्या बातम्या:























