एक्स्प्लोर

पीएम इंटर्नशिप योजनेचा दुसरा टप्पा सुरु, 1 लाखांहून अधिक युवकांना प्रशिक्षण मिळणार, 300 कंपन्यांमध्ये कामाची संधी

पीएम इंटर्नशिप योजनेचा दुसरा टप्पा सुरु होत असून याद्वारे देशातील 300 कंपन्यांमध्ये युवकांना अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळणार आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. देशातील  738 जिल्ह्यांमध्ये 300 टॉप कंपन्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. पीएम इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 300 टॉप कंपन्यांमध्ये  1 लाख  19 हजार हून अधिक जागांवर काम करुन युवकांना प्रशिक्षण मिळेल. 

या योजनेद्वारे 21 ते 24 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवकांना या योजनेत 12 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. यामध्ये जिल्हा, राज्य आणि क्षेत्राच्या आधारवर तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येईल. एखाद्या उमेदवाराला एक ऑफर पसंत नसेल तर ते दुसरा अर्ज करु शकतात.दुसरी ऑफर पण ते तिसरा अर्ज करु शकतात. 

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी https:pminternship.mca.gov.in/ या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. यामध्ये अर्ज करताना कोणतीही फी द्यावी लागणार नाही. जे पूर्णवेळ नोकरी करत नाहीत तेच उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. 

पीएम इंटर्नशिप योजनेत संधी मिळण्यासाठी आणखी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे जे पूर्णवेळ शिक्षण घेत आहेत, त्यांना देखील अर्ज करता येणार नाही. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत असू नये.  या शिवाय कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 

ऑईल , गॅस अँड एनर्जी, बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस, ट्रॅव्हल, ऑटोमोटिव्ह, मेटल अँड मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, एफएमसीजी सह रिलायन्स, एचडीएफसी, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी,एल अँड टी   या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करता येईल. 

दहावी पास उमेदवारांसाठी 24696, आयटीआय झालेल्यांसाठी 23629, डिप्लोमा धारकांसाठी 18589, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 15142 आणि पदवीधरांसाठी 36901 जागांवर इंटर्नशिप करता येईल. 

वर्षभर इंटर्नशिप करणाऱ्यांना दरमहा 5000 रुपये विद्यावेतनं दिलं जातं आणि एक वेळ 6000 रुपये दिले जातात. यासाठी बजेटमध्ये 840 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

भारतीय अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत आहे. विकसित देश म्हणून वाटचाल करायची असल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला प्रशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. 2030 पर्यंत 78.5 लाख रोजगार दरवर्षी निर्माण करण्याची गरज आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या युवकांकडे आवश्यक ते कौशल्य नसतं, असं समोर आलं आहे. त्यामुळं उद्योग जगताची गरज पाहता पीएम इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा पार पडला असून दुसरा टप्पा सुरु झाला आहे.

इतर बातम्या:

Bank job: बँकेत नोकरी हवीय? 4000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यास सुरुवात 
 
21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार का? नेमका कधी होणार निर्णय?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Embed widget