एक्स्प्लोर

Budget 2023-24 Income Tax: तातडीने आधी करा 'हे' काम, अन्यथा हाती येईल कमी पगार

Budget 2023-24 Income Tax: आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच नोकरदार वर्गाला गुंतवणुकीची माहिती जाहीर करावी लागणार आहे. अन्यथा पगारात कपात होईल.

Budget 2023-24 Income Tax: अर्थसंकल्पाचा दिवस (Budget 2023-24) जवळ येत असून दुसरीकडे यासोबतच आयकराशी संबंधित कामांनाही जोर आला आहे. कार्यालयात काम करणाऱ्यांकडून गुंतवणुकीचे पुरावे मागवले जात आहेत. गुंतवणुकीच्या पुराव्याच्या आधारे पुढील महिन्यात तुमचा पगार पूर्ण येईल की कमी येईल हे ठरवले जाईल. जर तुम्ही कर बचतीचा पुरावा सादर (Investment Declaration) केला नसेल, तर इन्कम टॅक्स (Income Tax) कापून तुमच्या खात्यात पगार जमा होईल. गुंतवणुकीच्या पुराव्यासाठी, तुम्ही कुठे गुंतवणूक (Investment Proof) केली आहे याचा पुरावा सादर करावा लागेल. कर्मचाऱ्याला प्रथम  त्याच्या कार्यालयात माहिती द्यावी लागेल की तो कुठे गुंतवणूक करत आहे. त्यानंतर जानेवारीत त्याचे पुरावे सादर करावे लागतात. 

आयकराच्या कलम 80C अंतर्गत, 1,50,000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. म्हणजेच, या कलम 80C अंतर्गत, तुम्ही विविध गुंतवणूक करून तुमचे एकूण करपात्र उत्पन्न 1,50,000 रुपयांनी कमी करू शकता. यामध्ये जीवन विमा पॉलिसी पावती, ULIPo मधील प्रीमियमचा पुरावा, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ELSS) मधील गुंतवणूक, PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि NSC मधील गुंतवणूक, आरोग्य विमा आदीतील गुंतवणुकीत तुम्हाला करसवलत मिळू शकते. 

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर कर सूट दिली जाते. तुम्ही कोणत्याही वर्षात वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा करायला विसरलात, तर नंतर तुम्ही आयकर रिटर्न भरून कर सवलतीचा दावा करू शकता.

या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ

कर वाचवण्यासाठी, कलम 80C अंतर्गत, तुम्ही म्युच्युअल फंड टॅक्स फंड (ELSS), बँकेच्या कर बचत मुदत ठेव योजना, NPS, PPF, जीवन विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. दोन मुलांच्या ट्यूशन फीवर देखील कर सूट उपलब्ध आहे. यासाठी शाळेने दिलेले फी प्रमाणपत्र द्यावे लागेल. कलम 80C अंतर्गत हा एकमेव खर्च आहे जो गुंतवणुकीच्या कक्षेत येत नाही.

जर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवायची असेल, तर तुम्हाला आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक करावी लागेल. या कालावधीत तुम्ही ज्या वर्षी गुंतवणूक कराल, त्याच वर्षासाठी तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळू शकेल. कोणत्या योजनेत किती गुंतवणूक करायची, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्याकडे दीड लाख रुपयापर्यंतची मर्यादा आहे. तुम्ही एवढी रक्कम एकाच ठिकाणी गुंतवणूक करू शकता. अथवा विविध योजनांमध्ये (विमा, पीपीएफ, ELSS) गुंतवू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांचे खडेबोल; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांनी सुनावले; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांचे खडेबोल; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांनी सुनावले; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Embed widget