Investment Tips : किरकोळ गुंतवणुकीवर 8 टक्के व्याज दर; केंद्र सरकारच्या महिलांसाठी दोन महत्त्वाच्या योजना
Investment Schemes For Women's : केंद्र सरकारच्या या दोन बचत योजनांचा महिलांना मोठा फायदा ठरू शकतो.
![Investment Tips : किरकोळ गुंतवणुकीवर 8 टक्के व्याज दर; केंद्र सरकारच्या महिलांसाठी दोन महत्त्वाच्या योजना Investment Schemes For Womens best investment for women Sukanya Samriddhi Yojana Mahila Samman Saving Certificate Scheme Investment Tips : किरकोळ गुंतवणुकीवर 8 टक्के व्याज दर; केंद्र सरकारच्या महिलांसाठी दोन महत्त्वाच्या योजना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/03/ced07cd29379c478186c984250284e0e1701613520198290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Investment Tips For Womens : सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्याचा फायदा थेट महिला किंवा मुलींना होतो. मुलीच्या लग्नासाठी किंवा चांगल्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) आहे. त्याचप्रमाणे, या वर्षीच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) नावाची महिलांसाठी विशेष बचत योजना सुरू केली. या दोन्ही योजनांमध्ये सरकार गुंतवणुकीवर व्याज देते. सुकन्या समृद्धी आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या दोन्ही योजना महिला वर्गासाठी चांगल्या आहेत.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने आपल्या पहिल्या टर्ममध्ये या योजनेची सुरुवात केली. ही योजना 10 वर्षापर्यंतच्या कन्यांसाठी आहे. त्यानुसार, 250 रुपयांच्या किमान गुंतवणुकीवरही मुलींचे खाते सुरू करता येऊ शकते. सरकारच्यावतीने या खात्यावर 8 टक्के व्याज दिले जाते. या योजनेत अधिकाधिक 1.50 लाख रुपये दरवर्षी गुंतवू शकता. मुलीच्या 18 व्या वर्षी तिच्या शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम खात्यातून काढता येऊ शकते. तर, वयाच्या 21 वर्षी लग्नाच्या खर्चासाठी ही रक्कम काढता येऊ शकते. आयकर खात्याच्या 80 सी नुसार, 1.50 लाखापर्यंतची सवलत मिळते. बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Saving Certificate Scheme)
या वर्षी सुरू झालेल्या या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. गुंतवणुकीची मर्यादा किमान रु. 1000 ते कमाल रु. 2 लाख आहे. तर सरकार 7.5 टक्के व्याज देते. हे व्याज तिमाही आधारावर जमा केले जाते. पहिल्या वर्षानंतर खातेदार 40 टक्के रक्कम काढू शकतात. समजा खाते ऑक्टोबर 2023 मध्ये उघडले असेल तर ते ऑक्टोबर 2025 मध्ये मॅच्युअर होईल. कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येऊ शकते.
हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. खाते उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल.
नियमांनुसार, खातेधारकाची इच्छा असल्यास, एक वर्षानंतर महिला बचत योजनेच्या खात्यातून 40 टक्के रक्कम काढता येऊ शकते. खातेदार आजारी पडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर ते बंद करू शकता. असे केल्यास तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)