(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PayTm Share Price : BSE ने PayTm ला विचारलं शेअरमध्ये घसरण का?, कंपनीने म्हटले...
PayTm Share Price : पेटीएमच्या शेअर दरात सातत्याने घसरण होत असून बीएसईने याबाबत कंपनीला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे.
PayTm Share Price : फिनटेक कंपनी पेटीएम (PayTm) च्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. शेअरमध्ये होणारी घसरण पाहता, मुंबई शेअर बाजाराने नोटीस देत याबाबत पेटीएमला विचारणा केली आहे. आतापर्यंत पेटीएमच्या शेअरमध्ये 75 टक्क्यांची घसरण झाली आहे.
पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशनचा स्टॉकचा शेअर दर आता 500 रुपयांपेक्षा कमी झाला आहे. कंपनीने शेअर बाजाराच्या नोटिसला उत्तर देताना सांगितले की, कंपनीचे शेअर का घसरत आहेत, याचीही आम्हाला कल्पना नाही. शेअर दरावर परिणाम कोणत्या कारणांमुळे होत आहे, याची माहिती नसल्याचे कंपनीने म्हटले. कंपनीचा तिमाही निकालही चांगला होता. व्यवसाय वाढवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. मात्र, शेअर दर का घसरत आहे, याची कल्पना नसल्याचे कंपनीने बीएसईला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.
पेटीएमने नोव्हेंबर 2021 मध्ये 2150 रुपये प्रति शेअर दरावर आयपीओ जारी केला होता. मात्र, शेअर दर सातत्याने घसरत आहे. बुधवारी शेअरचा दर 535 रुपये झाला होता. आयपीओद्वारे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1600 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
काही महिन्यांआधी पेटीएमचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपये होते. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 35, 915.27 कोटी रुपये झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Price Hike : मार्च महिन्यात सामान्यांना महागाईची झळ; इंधनांसह 'या' सहा वस्तूंची दरवाढ
- MDH Masala : भारतातील सर्वात प्रसिद्ध MDH मसाल्यांचे शेअर्स घसरले, कंपनीच विकायची आली वेळ
- फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha