MDH Masala : भारतातील सर्वात प्रसिद्ध MDH मसाल्यांचे शेअर्स घसरले, कंपनीच विकायची आली वेळ
प्रसिद्ध अशा MDH कंपनीला विकत घेण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. यात हिंदुस्थान युनिलिव्हर ही कंपनी विकत घेण्यासाठी सर्वात उत्सुक आहे.
MDH Masala : पुरातन काळापासून मसाल्यांसाठी भारत देश प्रसिद्ध आहे. अशामध्ये मागील बरीच दशकं भारतीय मसाल्यांची बाजारपेठ एमडीएच मसाला कंपनीने (MDH Masala Company) गाजवली आहे. कंपनीचे मालक धरमपाल गुलाटी यांनी कंपनी चालवण्यासोबत जाहिरातीतून केलेल्या हटके ब्रँडिंगमुळे तर कंपनीचा व्यापार आणि प्रसिद्धी आणखी वाढली. पण 3 डिसेंबर, 2020 मध्ये गुलाटी यांचे निधन झाले आणि आता वर्षभरातच कंपनी विकण्याची वेळ आली आहे. मागील काही काळात एमडीएचचे शेअर्सदेखील चार टक्क्यांनी घसरले असून आता कंपनी लवकरच विकली जाऊ शकते.
प्रसिद्ध अशा MDH कंपनीला विकत घेण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. यात मिंट वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतातील मोठ्या कंपन्यांपैकी एक हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever) कंपनी MDH कंपनीचा मोठा हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीला 10 ते 15 हजार कोटी रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. एमडीएच कंपनीच्या प्रसिद्धीबाबत बोलायचे झाले तर मागील बरीच दशकं राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रसिद्ध मसाला ब्रँड म्हणून MDH ची ओळख आहे. विविध भागातील लोकांच्या आवडी-निवडीनुसार त्यांनी मसाले तयार केले आहेत. तसंच त्यांच्या जाहिरातींना देखील सर्वत्र विशेष प्रसिद्धी मिळाल्याने ब्रँड आणखीच प्रसिद्ध झाला.
एमडीएचची 60 पेक्षा जास्त उत्पादने
एमडीएचच्या पोर्टफोलिओमध्ये 60 पेक्षा जास्त उत्पादने आहेत. त्यांचे वितरण नेटवर्क 1,000 पेक्षा जास्त घाऊक विक्रेते आणि लाखो किरकोळ विक्रेते लहान शहरे आणि गावांमध्ये पसरलेले आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हरलाही याचा फायदा होऊ शकतो. कंपनी दररोज 30 टन मसाल्यांचे उत्पादन करण्यास सक्षम आहे. मिंटच्या वृत्तानुसार, या संभाषणाबद्दल विचारले असता HUL आणि MDH यांनी प्रतिसाद दिला नाही. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, MDH ची निव्वळ विक्री 1,191 कोटी रुपये होती, ज्यावर 507 कोटी रुपयांचा नफा झाला.
हे ही वाचा :
- क्या राम, क्या रहीम, सब एक है, राम मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाकडून 2.5 कोटींची जमीन दान!
- Sana Khan : दुबई भ्रमंतीत सना खानने घेतला 24 कॅरेट चहाचा आस्वाद! बुर्ज खलीफाच्या 'या' चहाची किंमत ऐकलीत?
- Ambernath Crime News : धक्कादायक! जादूटोणा करण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण
- VIDEO : नदीत आढळलेला हा मासा म्हणजे 'जीवंत डायनासोर', 100 वर्षापर्यंत असू शकतं वय
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live