Aadhaar PAN Link : आधार-पॅन लिंक करण्यात अडचण येतेय? 'हे' आहे कारण; दंड भरण्यापासून वाचण्यासाठीचा शेवटचा उपाय जाणून घ्या...
Aadhaar-PAN Linkage : आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 जून ही शेवटची मुदत आहे. यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

PAN-Aadhaar Link : आयकर विभागाने (Incpme Tax) आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करणं अनिवार्य केलं आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अखेरची तारीख काही दिवसांवर आली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 जून ही शेवटची मुदत आहे. याआधी सरकारने अनेक वेळा यासाठी मुदत वाढ दिली आहे. पण, आता मात्र मुदतवाढ मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे ज्यांनी पॅन कार्ड आणि आधर कार्ड लिंक केलं नसेल तर घाई करा आणि 30 जून आधी हे काम करुन घ्या.
आधार-पॅन कार्ड लिंक न होण्याचं कारण काय?
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत असेल, तर नेमकी अडचण कुठे आहे जाणून घ्या. आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील तुमचं नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारख्या लोकसंख्यिक माहिती जुळत नसल्याने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यात अडथळे येऊ शकतात.
आधार-पॅन लिंक न केल्यास काय नुकसान होईल?
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उलटून गेली, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. 1 जुलैपासून तुम्हांला आधार-पॅन लिंक करताना एक हजार रुपये दंड भरावा लागेल. अंतिम मुदतीपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास तुमचा आयकर रिटर्न रोखला जाईल, असं आयकर विभागानं आधीचं स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ, जर तुम्ही पॅन आणि आधार लिंक केलं नाही तर तुम्हाला आयकर परतावा मिळू शकणार नाही. तसेच, ज्या कालावधीसाठी पॅन निष्क्रिय असेल त्या कालावधीसाठी तुम्हाला व्याज मिळणार नाही. आधारशी पॅन लिंक न करण्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे तुमच्याकडून जास्त टीसीएस आणि टीडीएस आकारले जातील.
आधार-पॅन कार्ड लिंक होण्यात अडथळा येतोय?
आयकर विभागानेही ट्विट करत ही माहिती दिली आहे. आधार कार्ड आणि पॅन लिंक करताना दोन्हींवरील काही माहितीमध्ये विसंगती आढळल्यास आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होण्यात अडथळे येऊ शकतात.
- नाव चुकलं असेल
- जन्मतारीख चुकीची असेल
- लिंग चुकीचं लिहिलं असेल
अशा वेळी करदात्याने आधी पॅन कार्ड आणि आधार कार्डवरील चुकीची माहिती दुरुस्त करून घ्यावी.
Kind Attention PAN holders!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) June 24, 2023
While linking PAN with Aadhaar, demographic mismatch may occur due to mismatch in:
• Name
• Date of Birth
• Gender
To further facilitate smooth linking of PAN & Aadhaar, in case of any demographic mismatch, biometric-based authentication has… pic.twitter.com/UQuFnjda38
'हा' आहे शेवटचा उपाय
जर तुम्ही हे आधीच केले असेल म्हणजेच तुम्ही पॅन आणि आधारच्या चुका दुरुस्त केल्या असतील, पण त्यानंतरही तुम्ही आधार आणि पॅन लिंक करू शकत नसाल, तर आयकर विभागाने यावरही उपाय दिला आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अधिक सुलभ करण्यासाठी बायोमेट्रिक-आधारित प्रमाणीकरण करण्याची सुविधा आहे. यासाठी तुम्ही पॅन सेवा केंद्र (Protean) आणि आधार सेवा केंद्र (UTIITSL) केंद्रांवर 50 रुपये शुल्क भरून या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
