एक्स्प्लोर
PAN-Aadhaar Link Penalty: उरलाय फक्त आठवडा... घाई करा, नाहीतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी भरावी लागणार पेनल्टी
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत अनेकदा वाढवण्यात आली आहे. आता 30 जून ही डेडलाईनं देण्यात आली आहे. यावेळी मात्र मुदत आणखी वाढण्याची अपेक्षा जवळपास शून्य आहे.
Aadhaar-PAN Linkage
1/10

Aadhaar-PAN Linkage: पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आता अनिर्वाय केलं आहे. केंद्र सरकारनं अनेकदा मुंदतही वाढवून दिली आहे. आता पुन्हा एकदा सरकारकडून देण्यात आलेली डेडलाईन जवळ आली. एकदा का पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उलटून गेली, तर मात्र तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
2/10

आजच्या काळात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. आयकर विभागानं पॅन कार्ड आधारशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे, ज्याची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे.
3/10

आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅन कार्डला आधारशी लिंक करणं अनिर्वाय करण्यात आलं आहे. जर 30 जून 2023 पर्यंत हे केलं नाही तर त्यानंतर तुमचा पॅन कार्ड अवैध ठरवलं जाईल.
4/10

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत अनेकदा वाढवण्यात आली आहे. आता 30 जून ही डेडलाईनं देण्यात आली आहे. यावेळी मात्र मुदत आणखी वाढण्याची अपेक्षा जवळपास शून्य आहे.
5/10

त्यामुळे अजिबात वेळ न घालवता पॅन कार्ड आधारशी लिंक करा. कारण 30 जूननंतर 1 जुलैपासून पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करताना तुम्हाला पेनल्टी भरावी लागणार आहे.
6/10

जर तुम्ही डेडलाईनपर्यंत हे काम केलं नाही, तर ई-फायलिंक पोर्टलवर लिंक करण्यापूर्वी तुम्हाला एक हजार रुपये पेनल्टी भरावी लागणार आहे.
7/10

ई-फायलिंग पोर्टलवर त्या बँकांची लिस्ट आधीपासूनच उपलब्ध आहे. या बँकांमधून तुम्ही पेनल्टी भरण्यासाठी चलान तयार करु शकता.
8/10

पॅन कार्ड आधारशी लिंक नाही केलं, तर अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे की, डेडलाईनपर्यंत असं नाही केलं तर संबंधित टॅक्सपेयर्सचा रिफंड थांबवला जाईल.
9/10

याचाच अर्थ असा की, जर तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर तुम्हाला इनकम टॅक्स रिफंड मिळणार नाही.
10/10

एवढंच नाहीतर तुम्ही पेनल्टी देऊन आधार आणि पॅन कार्ड लिंक करत असाल, तरीही तुम्हाला नुकसान भोगावं लागणार आहे. एकीकडे पॅन-आधार लिंक करण्यासाठी दंड भरावा लागणार आणि दुसरीकडे पॅन इनऑपरेटिव्ह असल्यामुळे व्याजही मिळणार नाही.
Published at : 22 Jun 2023 02:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
व्यापार-उद्योग
























