PAN Aadhaar Link : पॅन कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यात अडचण येतेय? 'ही' पद्धत वापरा, 31 मार्चपूर्वी महत्त्वाची कामे उरकून घ्या
PAN Aadhaar Link : अनेकांना पॅन-आधार लिंक करण्यात अडचणी येत आहेत कारण त्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर यासारखी मूलभूत माहिती पॅन कार्ड आणि आधार कार्डमध्ये स्वतंत्रपणे नोंदवली जाते.
PAN Aadhaar Link : आधार कार्ड आणि पॅन कार्ड देशातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहेत. ही दोन्ही कागदपत्रे जवळपास सर्वत्र वापरली जातात. बँकेत खाते उघडायचे असो किंवा कुठेही गुंतवणूक करायची असो, शाळेत प्रवेश घेण्यापासून दागिने खरेदी करणे, घर किंवा दुकान खरेदी करणे प्रत्येक कामासाठी आधारकार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार 31 मार्च 2022 पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे न केल्यास तुमचे पॅन कार्ड अवैध ठरवण्यात येईल. यासोबतच तुम्हाला गुंतवणुक, पीएफवर जास्त टीडीएस यासारख्या अनेक कामांमध्ये अडचणीचा सामना करावा लागेल.
31 मार्चपूर्वी पॅन आणि आधार लिंक करा. 31 मार्चनंतर या कामासाठी तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. दरम्यान, अनेक वेळा पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यामध्ये अनेकांना अडचणी येतात. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. ही समस्या कशी सोडवायची ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पॅन आधार लिंक करताना 'ही' समस्या येते
अनेकांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करताना अडचणी येत आहेत. कारण त्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती पॅन कार्ड आणि आधार कार्डमध्ये स्वतंत्रपणे नोंदवली जाते. या दोन्ही पैकी एकामध्ये चुकीची माहिती असेल तर दोघेही एकमेकांशी जोडताना अडचण येते. जर तुम्हाला ही समस्या येत असेल तर तुम्ही ती सहज सोडवू शकता.
अशा प्रकारे चूक दुरुस्त करा
जर तुमच्या आधार कार्डमध्ये चुकीची माहिती लिहिलेली असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन चुकीची माहिती दुरुस्त करून घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही माहिती दुरुस्त करू शकता. तसेच, जर पॅन कार्डमधील चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर क्लिक करून दुरुस्त करू शकता. यानंतर तुम्ही दोन्ही कार्ड लिंक करू शकता.
अशा प्रकारे आधार आणि पॅन लिंक करा
- आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आयकर वेबसाइट https://www.incometaxindia.gov.in/pages/pan.aspx ला भेट द्या.
- आधार लिंकचा पर्याय निवडा
- आधार आणि पॅन क्रमांकासाठी विचारलेले तपशील प्रविष्ट करा.
- नंतर कॅप्चा प्रविष्ट करा.
- त्यानंतर लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : कोरोना संसर्गात पुन्हा वाढ, देशात गेल्या 24 तासांत 4377 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू
- SIM Card : सिम कार्डचा एक कोपरा का कापलेला असतो? जाणून घ्या 'या' डिझाइन मागचं खरं कारण
- Holi 2022 : होळी रे होळी! होळीत केमिकलयुक्त रंग टाळा, घरच्या घरी फुलांपासून तयार रंग करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha