एक्स्प्लोर

NSE Scam: चित्रा रामकृष्ण यांना अटक, सीबीआयची कारवाई

NSE Scam Chitra Ramkrishna : एनएसई घोटाळा प्रकरणी एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर अटकेची टांगती तलवार मागील काही दिवस होती आज अखेर त्यांना अटक झाली आहे.

NSE Scam : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना नुकतीच सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. विशेष सीबीआय कोर्टाने काही दिवसांपूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांना अटक होण्याची दाट शक्यता होती. अखेर आज त्यांना अटक झाली आहे. चित्रा यांच्यावर हिमालयातील एका कथित योगीच्या सूचनेवरून  काम करणे आणि संवेदनशील माहिती देण्याचा आरोप आहे. सीबीआयने चित्रा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. 

सीबीआयने काही दिवसांपूर्वी एनएसईचे माज ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रम्हण्यम याला चेन्नईतून अटक केली होती. हिमालयातील योगी हा दुसरा कोणी नसून आनंद सुब्रम्हण्यम आहे, असे म्हटले जात आहे. एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आनंदवर आहे. एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण या आनंदच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत होत्या. सध्या आनंद सुब्रम्हण्यम सीबीआय कोठडीत आहे. 

काय आहे प्रकरण ?

चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. 

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.

सेबीने  NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget