एक्स्प्लोर

NSE CASE: चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून लुकआउट परिपत्रक जारी

NSE CASE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्या मुंबईतील घरावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापा टाकला होता.

NSE CASE:  सीबीआयने एनसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) को-लोकेशन प्रकरणात चौकशी केली आणि चित्रा रामकृष्ण यांनी देश सोडून पळून जाऊ नये म्हणून लुकआउट परिपत्रकही जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  याच प्रकरणात एनएसईचे माजी सीईओ रवी नारायण आणि माजी सीओओ आनंद सुब्रमण्यन यांच्या विरोधातही लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

आयकर विभागाचे छापे

याआधीही गुरुवारी आयकर विभागाने एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावरही छापा टाकला. हिमालयीन पर्वतरांगा मध्ये राहणाऱ्या योगींना माहितीची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

सीबीआयकडून गुन्हा दाखल

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.

तपासाची व्याप्ती वाढू शकते

रामकृष्ण यांच्या कार्यपद्धतीत आणि नैतिक आचरणात गंभीर त्रुटी असल्याचे सेबीला आढळून आले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सेबी व्यतिरिक्त सीबीआय, आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय देखील या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत. एनएसईचे माजी सीओओ आनंद सुब्रमण्यम यांच्यावरही सेबीने कारवाई केली आहे. त्याच्यावर 3 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर चित्रा रामकृष्ण यांनाही ३ कोटींचा तर रवि नारायण यांना २ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयकर विभागाच्या तपासाची व्याप्ती वाढू शकते. यामध्ये ईडी देखील सहभागी होऊ शकते.

संबंधित बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Embed widget