एक्स्प्लोर

आता BHIM अॅपला क्रेडिट कार्ड जोडा आणि डिजिटल पेमेंट सुलभ, सुरक्षितपणे करा

BHIM App: बरेचदा डिजिटल पेमेंट करताना महिनाअखेरीस बँक खात रिकामं असतं आणि अशा वेळी तुमच्याकडे पर्याय असतो तो म्हणजे क्रेडिट कार्डचा.

BHIM App: बरेचदा डिजिटल पेमेंट करताना महिनाअखेरीस बँक (Bank) खात रिकामं असतं आणि अशा वेळी तुमच्याकडे पर्याय असतो तो म्हणजे क्रेडिट कार्डचा (Credit Card). पण क्युआर कोड (Qr Code) वापरुन तुम्ही डिजिटल पेमेंट करता येत नाही. पण तुम्ही डिजिटल पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही शेजारच्या किराणा दुकानात UPI QR कोड स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्यास सहजपणे भरु शकणार आहात. आतापर्यंत बँक खाते युपीआय अॅपशी लिंक करून पेमेंट करण्याची सुविधा होती. यामध्ये आता काहीसा नाविन्यपूर्ण बदल होताना दिसतो आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे  (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये UPI सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले. जून महिन्यातच एमपीसीच्या बैठकीनंतर आता क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करून पेमेंट करता येईल असं आरबीआयने सांगितले होतं 

कुठल्या बँकांच्याद्वारे लाभ?

क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये मास्टरकार्ड आणि व्हिसा यांचे वर्चस्व असले तरी बहुतेक वापरकर्त्यांना UPI द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची सुविधा मिळेल. सध्या या सुविधेचा लाभ पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी उपलब्ध असेल. या तिन्ही बँकांची रुपे क्रेडिट कार्डे NPCI द्वारे संचालित BHIM अॅपवर लाइव्ह झाली आहेत.

क्रेडिट कार्ड BHIM अॅपशी लिंक करण्याची प्रक्रिया

1) सर्व प्रथम BHIM अॅप उघडा.

2) तुमचे रुपे क्रेडिट कार्ड आता लिंक करा किंवा लिंक केलेल्या बँक खात्यावर क्लिक करा.

3) बँकेत क्रेडिट कार्ड किंवा पंजाब नॅशनल बँक किंवा युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक प्रविष्ट करा.

4) आता संबंधित कार्डवर क्लिक केल्यावर मोबाइल नंबरशी लिंक केलेल्या क्रेडिट कार्डचा तपशील येईल.

5) आता क्रेडिट कार्डचे शेवटचे ६ अंक आणि वैधता टाका.

6) यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
 
7) UPI पिन तयार करा. अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

8) आता UPI QR कोड स्कॅन करा आणि कार्ड निवडा आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.

शुल्कात स्पष्टता नाही

हाती आलेल्या माहितीनुसार युपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करून UPI पेमेंट करण्यासाठी कोणताही MDR आकारला जाणार नाही. एक लहान इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. परंतु याबाबत पूर्णपणे स्पष्टता देण्यात आलेली नाही.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यताPrakash Solanke On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरुन हटवा, अजित पवार,फडणवीसांकडे मागणीBeed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali Damania

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
Donald Trump : लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Embed widget