एक्स्प्लोर

Reserve Bank of India : प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नाहीत, RBI चे स्पष्टीकरण

नोटा छापण्याच्या प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नसल्याचं रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं आहे.

Reserve Bank of India : नोट गहाळ झाल्याप्रकरणी आलेल्या बातम्यांबाबत आरबीआयकडून (Reserve Bank of India ) कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नोटा छापण्याच्या प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नसल्याचं रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. प्रिंटिंग प्रेसमधून RBI ला पुरवलेल्या सर्व नोटांचा योग्य हिशोब केला जात असतो. सोबतच प्रेसमध्ये छापलेल्या आणि आरबीआयला पुरवल्या जाणाऱ्या नोटांच्या ताळमेळासाठी मजबूत यंत्रणा असते असंही RBI ने म्हटलं आहे. 

नोटांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यावर देखरेख ठेवण्यासाठी नियमावली असल्याचे RBI ने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नोटा छापण्याच्या प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नसल्याचं रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियानं सांगतिलं आहे. तर कुठे, किती नोटा छापल्या? किती रवाना झाल्या? याची संपूर्ण नोंद असते. आजही कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे एकही नोट गहाळ होऊ शकत नाही. सध्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा असून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेस (Nashik Currency Note Press) मजदूर संघाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

नाशिकसह (Nashik) देवास (Devas) आणि बंगळुरू मधील नोट प्रेसमधून छापण्यात आलेल्या 82 हजार कोटीच्या नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत (Reserve Bank) गेल्याच नाही, अशी एका वृत्त पत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. मात्र हा तांत्रिक मुद्दा असून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिले आहे. या संदर्भात आरटीआय (RTI) कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात माहिती विचारली होती, त्यानुसार ही माहिती उघडकीस आली. त्यानुसार नोट प्रेसकडून रिझर्व्ह बँकेला 31 मार्च या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोटांचा पुरवठा केला जातो, असे सांगण्यात आले आहे. 

एकही नोट गहाळ होऊ शकत नाही, सध्या फक्त अफवा सुरु

रस्ता मार्गाने आणि रेल्वेने ही नोटांचा पुरवठा होतो. त्यामुळे काही नोटा दोन तीन दिवसांनी पोहचतात, त्याची नोंद एप्रिल महिना म्हणजेच पुढील आर्थिक वर्षांत केली जाते, जी बातमी आहे, त्यात केवळ नोटा रवाना झाल्याची माहिती आहे. त्या कधी पोहचल्या त्याची माहिती नाही. रिझर्व्ह बँकेची पुढील सहा सात वर्षांची नोटांची नोंद आणि डिसपॅच झालेल्या नोटांची तुलना केली तर तरी एकच रक्कम आहे. त्यामुळे नोटा गहाळ झाल्यात असे म्हणणे चुकीचे आहे. कुठे किती नोटा छापल्या? किती रवाना झाल्या? याची संपूर्ण नोंद असते. आजही कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे एकही नोट गहाळ होऊ शकत नाही. सध्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे नाशिक प्रेसकडून खुलासा केला जात असल्याचे गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Note Press : नोटा गहाळ झाल्याच्या अफवाच, गैरसमजातून हा प्रकार, करन्सी नोट प्रेसकडून स्पष्टीकरण 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget