(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Elon Musk : एलॉन मस्क यांची ट्विटर डील शेवटच्या टप्प्यात, 75 टक्के Twitter कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
Elon Musk Twitter Deal : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील शेवटच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर मस्क 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे.
Elon Musk Twitter Deal : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील शेवटच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. वादग्रस्त ठरलेली ट्विटर डील (Twitter Deal) लवकरच पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर अनेक ट्विटर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. एलॉन मस्क ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या ट्विटर कंपनीमध्ये 7500 कर्मचारी आहेत. रिपोर्टनुसार, एलॉन मस्क ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या विचारात आहेत. शिवाय या चर्चेमुळे ट्विटर कंपनीमध्ये हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ट्विटर कंपनीने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की ट्विटर कंपनीची कर्मचाऱ्यांच्या कपातीची कोणतीही योजना नाही.
एप्रिलमध्ये करार केल्यानंतर मस्क यांनी घेतली होती माघार
एलॉन मस्क (Elon Musk) यांची ट्विटर डील मागील काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. बहुचर्चित ट्विटर डील (Twitter Deal) लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे तसेच स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एप्रिल महिन्यामध्ये ट्विटर (Twitter) खरेदी करण्याची योजना आखली. त्यानंतर माहिती लपवल्याचा आणि बनावट खात्यांसंबंधित योग्य माहिती न दिल्याचा आरोप करत मस्क यांनी ट्विटरने ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा ही डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एलॉन मस्क ट्विटर खरेदी करु शकतात. इतकंच नाही तर मस्क सुरुवातीला ठरलेल्या कराराच्या किंमतीत म्हणजेच 54.20 डॉलर प्रति शेअर किमतीने 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करणार आहे.
एलॉन मस्क ट्विटर डीलसाठी उत्साहित
एलॉन मस्क यांनी 20 ऑक्टोबर रोजी प्रतिक्रिया देत म्हटलं की, मी ट्विटर डीलसाठी खूप उत्सुक आहे. मात्र, या सोशल मीडिया कंपनीसाठी कंपनीच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. मस्क यांनी आता प्रति शेअर 54.20 डॉलरमध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आहे. सुरुवातीला मस्क यांचा ट्विटर करार याच किमतीत ठरला होता. मात्र, त्यानंतर बनावट खात्यांचा माहिती लपवल्याने ट्विटर कंपनी कमी किमतीत खरेदी करण्याची ऑफर मस्क यांनी दिली होती. त्यानंतर मस्क यांनी ट्विटर डील मोडली होती आणि आता पुन्हा मस्क ट्विटर खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
ट्विटर कर्मचाऱ्यांची चिंता वाढली
ट्विटर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मस्क यांची योजना समोर आल्यानंतर ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. ट्विटर डीलबाबत मस्क यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. या कायदेशीर लढाईतून सुटका म्हणून मस्क यांनी माघार घेत पुन्हा ट्विटरला करारासाठी नवं पत्र पाठवलं आहे. यावर ट्विटर कंपनीवर पुढील बाबी अवलंबून आहेत.