एक्स्प्लोर

Elon Musk : एलॉन मस्क यांचा युटर्न, खटल्यावरील सुनावणी आधी मस्क यांच्याकडून ट्विटर खरेदीसाठी ऑफर

Elon Musk Twitter Deal : एलॉन मस्क यांच्याकडून ट्विटर खरेदीचा करार पूर्ण होऊ शकतो. मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यास नकार दिला होता.

Elon Musk Twitter Deal : बहुचर्चित ट्विटर डील (Twitter Deal) पूर्ण होण्याची शक्यता आहे. टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter)) खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता पुन्हा ही डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग न्यूजच्या रिपोर्टनुसार, एलॉन मस्क ट्विटर खरेदी करु शकतात. मस्क यांनी ट्विटर कंपनीला 54.20 डॉलर प्रति शेअर किमतीने ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. यानंतर ट्विटर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतींत वाढ झाल्याचं पाहाया मिळालं. ट्विटरच्या शेअर्सची किंमत 13 टक्क्यांनी वाढून 47.95 प्रति डॉलरपर्यंत पोहोचली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार मोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता हा करार पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. आता पुन्हा एकदा मस्क यांनी सुरुवातीला ट्विटरला दिलेल्या ऑफरच्या किमतीत म्हणजे 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव ट्विटरला दिला आहे. ही एलॉन मस्क यांची माघार असल्याचं पाहायला मिळतंय.

मस्क यांच्याकडून ट्विटरला डील पूर्ण करण्यासाठी पत्र

एलॉन मस्क यांनी ट्विटर डील मोडल्यानंतर ट्विटरने हे प्रकरण कोर्टात नेलं.  मस्क आणि ट्विटर यांच्यातील वादानंतर या महिन्यापासून अमेरिकन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. मात्र याआधी मस्क यांनी ट्विटर कंपनीला पत्र लिहित ट्विटर डील खरेदी करण्याची ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये नव्या डीलबाबतच्या सर्व गोष्टींचा तपशीलवार खुलासा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत ट्विटर किंवा एलॉन मस्क यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मस्क यांनी टेस्लाचे शेअर्स विकले

मीडिया रिपोर्टनुसार, एलॉन मस्क यांनी त्यांची कंपनी टेस्लाचे सात बिलियन डॉलर्स किमतीचे शेअर्स विकल्याची माहिती समोर आली होती. या विक्रीतून एलॉन मस्क यांना 6.9 बिलियन डॉलर रक्कम मिळाली. यामुळे एलॉन मस्क पुन्हा ट्विटर डील पूर्ण करणार का याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता एलॉन मस्क 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर डील खरेदी करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

ऑक्टोबरपासून खटल्यावरील सुनावणीला सुरुवात

टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे. त्यानंतर ट्विटरनं हा वाद आता कोर्टात नेला. या प्रकरणात 17 ऑक्टोबरपासून खटल्यावरील सुनावणीला सुरुवात होणार आहे. एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील 44 अब्ज डॉलरचा करार सुरुवातीपासूनच चर्चेत होता, पण मस्क यांनी ट्विटर डील मोडली. ट्विटरने मस्क यांना कंपनीबाबत पुरेशी आणि योग्य माहिती न दिल्याने मस्क यांनी ट्विटर करार मोडण्याची घोषणा केली होता. याविरोधात ट्विटरने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर आता पुन्हा ही ट्विटर डील सुरुवातीला ऑफर केलेल्या 44 अब्ज डॉलरच्या किमती खरेदी करण्याची ऑफर मस्क यांनी ट्विटर कंपनीला दिली आहे. आता 17 ऑक्टोबरपासन ट्विटरने कोर्टात दाखल केलेल्या खटल्यावर सुनावणी पार पडणार आहे, त्याआधी हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून मस्क यांनी ट्विटरला ऑफरचं पत्र पाठवत सुरुवातीला ठरलेल्या मूळ किमतीत म्हणजे 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 24 January 2025Job Majha : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता काय?Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभ मेळ्यामध्ये स्वीकारली संन्यासाची दीक्षा100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget