Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या तुळजापुरात (Tuljapur) दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या तुळजापुरात (Tuljapur) दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन गटातील राड्यात हवेत गोळीबार झाल्याचीही माहिती आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यात ही हाणामारीची घटना घडलीय. तर या हाणामारीत तलवार आणि चाकूचा देखील वापर केल्याचे बघायला मिळालंय. गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोन गटातील या राड्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावत जमाव पांगवलाय.
Tuljapur Crime News : काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी, मानावर चाकू, कोयत्याने वार
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातुन हि मारामाराची घटना घडलीय. परिणामी त्याला आता हिंसक वळण लागले आहे. भाजप उमेदवार पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीच्या ऋषी मगर यांच्यात वाद निर्माण झाला होता. अगोदर हा वाद मिटला होता. मात्र त्यानंतर पुन्हा या वादाला हिंसक वळण लागून यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर हल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. कुलदीप मगर यांच्या मानावर चाकूने, कोयत्याने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती, दरम्यान त्यांना रात्रीच उपचारासाठी सोलापूरला हलवले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
Tuljapur Crime : राड्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावत जमाव पांगवला
दोन गटातील या राड्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावत जमाव पांगवलाय. मंगळवारच्या रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि तपास करण्यात येतोय. एकीकडे महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. अशातच या दोन गटातील राड्यानंतर तुळजापुरातील राजकीय वातावरण अजून तापल्याचे बघायला मिळते आहे.
भय इथले संपत नाही ..कल्याण पूर्वेत मेट्रो मॉलसमोर भर रस्त्यात मद्यपी तरुणाचा धिंगाणा
वेगवेगळ्या घटनांनी चर्चेत असलेल्या कल्याण पुर्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कल्याण मेट्रो मॉलसमोर एक मद्यपीने भर रस्त्यात वाहने अडवून अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मद्यपीच्या धिंगाण्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा मद्यपी एवढ्यावरच थांबला नसून त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांची तोडफोड केली कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी या मद्यपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
ही बातमी वाचा:





















