Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला परफ्यूम विक्रेता, एलॉन मस्क बनले सेल्समन, कारण काय?
Perfume Salesman Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) आता सेल्समन बनले आहेत. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल करत स्वत:ला परफ्यूम सेल्समन (Perfume Salesman) म्हटलं आहे.
Elon Musk Perfume Salesman : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर (World's Richest Man) चक्क परफ्यूम विकण्याची (Perfume Salesman) वेळ आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) आता सेल्समन बनले आहेत. एलॉन मस्क यांनी स्वत:ला सेल्समन म्हटलं आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल करत स्वत:ला परफ्यूम सेल्समन म्हटलं आहे. एलॉन मस्क यांचं नवीन ट्विट सध्या चर्चेत आहेत. त्यांनी एका परफ्यूमच्या बॉटलचा फोटो पोस्ट करत याला पृथ्वीवरील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं. या ट्विट नंतर त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील माहितीमध्ये बदल करून स्वत:ला परफ्यूम सेल्समन (Perfume Salesman) म्हटलं आहे. यामुळे सोशल मीडियावर एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
एलॉन मस्क नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. अलिकडे त्यांची ट्विटर डील चर्चेत आहे. त्यांनी आधी ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली, नंतर ही ट्विटर डील मोडली. त्यानंतर आता पुन्हा मस्क ट्विटर खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. एलॉन मस्क यांचे ट्विट अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
The finest fragrance on Earth!https://t.co/ohjWxNX5ZC pic.twitter.com/0J1lmREOBS
— Elon Musk (@elonmusk) October 11, 2022
एलॉन मस्क बनले परफ्यूम विक्रेता
एलॉन मस्क यांनी एका परफ्यूमच्या बॉटलचा फोटो ट्विट केला आहे. बर्नट हेअर परफ्यूम (Burnt Hair Perfume) असं नाव असलेल्या परफ्यूमची बॉटल या फोटोमध्ये दिसत आहे. हा परफ्यूम 'द बोरींग कंपनी' (The Boring Company) या ब्रंडचा आहे. या परफ्यूमची किंमत 100 डॉलर म्हणजे 8400 रुपये आहे. या परफ्यूचं एलॉन मस्क यांनी कौतुक केलं आहे. हा परफ्यूम पृथ्वीवरील सर्वात सुंदर परफ्यूम असल्याचा दावा एलॉन मस्क यांनी केला आहे.
दरम्यान हा बर्न्ट हेअर परफ्यूम (Burnt Hair Perfume) 'द बोरींग कंपनी' (The Boring Company) या ब्रंडचा आहे. 'द बोरींग कंपनी' ही एलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे. 'द बोरींग कंपनी' अमेरिकन टनल बनवणारी कंपनी आहे. दरम्यान ही कंपनी एलॉन मस्क यांच्या मालकीची आहे. या कंपनीने एक परफ्यूम लाँच केला आहे. या परफ्यूमची जाहिरात करण्यासाठी एलॉन मस्क यांनी नवीन मार्ग शोधला आहे. म्हणून त्यांनी स्वत:ला परफ्यूम सेल्समन म्हटलं आहे.
मस्क यांनी बर्न्ट हेअर परफ्यूम (Burnt Hair Perfume) चा फोटो आणि लिंक त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे आणि लोकांना हा परफ्यूम खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी हा परफ्यूम विकत घेतला आहे.
एलॉन मस्क यांनी स्वत:ला परफ्यूम सेल्समन म्हटल्यानंतर यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्यांने नवीन नोकरी मिळाल्याबद्दल एलॉन मस्क यांचं अभिनंदन केलं आहे. अनेकांनी परफ्यूम खरेदी केल्याचं सांगितलं आहे. तर परफ्यूमचं नाव बर्न्ट हेअर म्हणजे जळालेले केस असा शब्दशा अर्थ घेत नेटकऱ्यांनी यावर अनेक मीम्स शेअर केले आहेत.
Congrats #ElonMusk for New Job pic.twitter.com/FfpXqkCNIJ
— AskToRahulSingh©️ (@AskToRahulSingh) October 12, 2022
Just tried it out, how do I look? pic.twitter.com/5SNIisNhLj
— daanksy (@daanksy) October 11, 2022
— FLOKI (@RealFlokiInu) October 11, 2022