Multibagger Stock 2021: या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल! सहा महिन्यांत 108.93 टक्के परतावा
Multibagger stock in India: या शेअरमध्ये वर्ष 2021 मध्ये जवळपास 215 टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून आली.
Multibagger stock: या वर्षी अनेक मल्टिबॅगर शेअर्सने (Multibagger stock 2021) गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबाबत माहिती देणार आहोत. या शेअरमध्ये वर्ष 2021 मध्ये जवळपास 215 टक्क्यांची वाढ दिसून आली. HG Infraच्या शेअर्सने गुंतवणुकदारांची चांदी केली आहे. मिडकॅप स्टॉकची किंमत 220 रुपयांहून वाढून 695 रुपये इतकी झाली आहे.
दुसऱ्या तिमाहीत चांगला नफा
कंपनीने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चांगला नफा कमावला आहे. येणाऱ्या पुढील तिमाहीत कंपनी चांगली कामगिरी करणार असल्याचा अंदाज आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीनुसार, या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना आगामी काळात चांगला परतावा मिळू शकतो.
920 रुपयांचे लक्ष्य
HDFC Sec नुसार, एचजी इन्फ्राचा शेअर 920 रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी खरेदी करू शकता. एचजी इन्फ्रा शेअरची किंमत सध्या 695 रुपये आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीत या शेअरमध्ये 30 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होऊ शकतो.
महसूल किती?
दुसऱ्या तिमाहीच्या निकालानुसार, HDFC सिक्युरिटीने म्हटले की, HG इन्फ्राचा महसूल EBITDA आणि APAT क्रमश: 7.5 अब्ज. 1.2 अब्ज आणि 0.7 अब्ज इतका नोंदवण्यात आला.
गुंतवणुकदारांना किती परतावा?
एका वर्षाचा परतावा पाहिल्यास कंपनीचा शेअर 253.60 टक्क्यांनी वाढला आहे. या दरम्यान, कंपनीचा शेअर 498.45 रुपयांहून वाढून 695 रुपये इतका झाला. तर, 5 वर्षात कंपनीच्या शेअरने 159.57 टक्क्यांचा परतावा दिला आहेय. तर, कंपनीच्या शेअरने 108.93 टक्क्यांचा फायदा करून दिला आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)
संबंधित वृत्त:
'या' IPO ने तोडले सब्सक्रिप्शनचे उच्चांक; गुंतवणुकदारांची मोठी अपेक्षा
Paytm IPO ची कमाल, एका क्षणात पेटीएमचे 350 कर्मचारी कोट्यधीश होणार