'या' IPO ने तोडले सब्सक्रिप्शनचे उच्चांक; गुंतवणुकदारांची मोठी अपेक्षा
Latent View Analytics किरकोळ गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये जोरदार स्वारस्य दाखवले आणि त्यांच्या शेअरला राखीव श्रेणीमध्ये 119.44 पट जास्त बोली मिळाली.
लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सच्या (Latent View Analytics)आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले. कंपनीच्या 1.75 कोटी इक्विटी शेअरच्या मोबदल्यात 572.18 कोटी इक्विटी शेअरसाठी बोली लागली आहे. या आकड्यांनुसार, लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सच्या आयपीओसाठी 326.49 पटीहून अधिक सब्सक्रिप्शन मिळाले आहेत.
किरकोळ गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये जोरदार स्वारस्य दाखवले आणि त्यांच्या शेअरला राखीव श्रेणीमध्ये 119.44 पट जास्त बोली मिळाली. आयपीओमधील काही भाग कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीही राखीव ठेवण्यात आला आहे. त्या भागासाठी 3.87 पट जास्त बोली लावली गेली आहे.
अशी नोंदवली गेली मागणी
क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्ससाठी राखीव असलेला एकूण हिस्सा 145.8 पटीने अधिक सब्सक्राइब करण्यात आला. तर, बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी राखीव असलेल्या भागांसाठी 850.66 पटीने अधिक बोली लावली. अशाप्रकारे Latent View Analytics च्या आयपीओला 326.49 पटीने अधिक बोली लावण्यात आली.
Latent View Analytics चा आयपीओ बुधवारी 10 नोव्हेंबर रोजी खुला झाला होता. कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर 190-197 रुपये इतकी किंमत ठरवली आहे.
ग्रे मार्केटची हवा काय?
एका वृत्तानुसार, ग्रे मार्केटमध्ये Latent View Analytics चा प्रति शेअर दर 500 रुपयांवर होता. आयपीओसाठी ठरवण्यात आलेल्या प्रति शेअर दरापेक्षा हा दर जवळपास 300 रुपयांहून अधिक आहे. त्यामुळेच शेअर बाजारात हा शेअर लिस्ट होताना 100 टक्के अधिक दराने लिस्ट होईल असा अंदाज गुंतवणुकदार वर्तवत आहेत.
Latent View Analytics कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 600 कोटी उभारणार आहे. यामध्ये 474 कोटी रुपये फ्रेश इश्यू आणि 126 कोटी रुपये ऑफर फॉर सेल (OFS)असणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीचे प्रमोटर Adugudi Viswanathan Venkatraman आपले शेअर्स विकणार आहेत. त्यांच्याशिवाय इतरही प्रमोटर, भागिदार आपले शेअर विकणार आहेत.
कंपनीचा व्यवसाय काय ?
Latent View चा व्यवसाय हा ग्राहकांच्या एनालिटिक्सशी संबंधित आहे. जागतिक ग्राहक एनालिटिक्सची बाजारपेठ एकूण एनालिटिक्सचा खर्च फक्त 9 टक्के आहे. मात्र, 2020-2024 दरम्यान 26 टक्के CAGR वाढण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या उत्पन्नात अमेरिकेतून 92.88 टक्के कमाई होते. तर, ब्रिटनमधून 1.85 टक्के उत्पन्न मिळते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीच्या नफ्यात 25.6 टक्के म्हणजे 91.46 वाढ झाल्याचे दिसून आले.