एक्स्प्लोर

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पुन्हा 3000 रुपये मिळण्यास सुरुवात, बँक खाते लगेच करा चेक

Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये येण्यास सुरुवात झाली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे. 

महिलांना 3000 रुपये मिळण्यास सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. महिलांची चिंता करू नये. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत. 

महिलांना एकूण मिळाले 7500 रुपये

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती.  त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत. 

केवायसी करण्याचे आवाहन

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.  

हेही वाचा :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका, 18 बँक खाती सील, अदिती तटकरेंकडून यादी पोस्ट

'लाडकी बहीण'चा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार, जाणून घ्या पैसे मिळण्यासाठी किती दिवस राहिले?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी, नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्समध्ये मिळणार, 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात 3 हजार जमा होणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News :  11 December 2024  : दिवसभरातील सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaMaharashtra Beauty Parlour And Salon Rates : नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणारMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक- सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
Best Bus Accident: मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
Embed widget