एक्स्प्लोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका, 18 बँक खाती सील, अदिती तटकरेंकडून यादी पोस्ट

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्या नांदेडमधील व्यक्तींची 18 बँक खाती सील करण्यात आली आहेत.

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.  

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या. 

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं.  सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.

इतर बातम्या : 

बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळण्यास सुरुवात, पाहा तिसरा हप्ता आला की नाही? 'ही' अट अजूनही कायम!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
Iran vs Israel : इराणनं 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला, इस्त्रायलकडून व्हिडीओ शेअर करत मनसुबे जाहीर, जगाचं टेन्शन वाढणार
इस्त्रायलनं व्हिडीओ शेअर केला, इराणमध्ये हल्ला कुठं करणार याचे संकेत दिले, जगाचं टेन्शन वाढणार
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
Amit Shah: एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yashomati Thakur On Devendra Bhuyar : महिला उपभोगाचं साधन आहे का? यशोमती ठाकूर यांचा सवालNitesh Rane Interview : नितेश राणे हिंदू गब्बर! मुस्लिम बांधवांचा द्वेष का करतात? स्फोटक मुलाखतShailendra Deolankar On Iran Israel: भारतीयांनी इराणमध्ये प्रवास करणं टाळा, परराष्ट्र खात्याचा इशाराSupriya Sule : नागरी उड्डाण मंत्रालयाला सुरक्षा उपायांसंदर्भात पत्र लिहिणार : सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
Iran vs Israel : इराणनं 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला, इस्त्रायलकडून व्हिडीओ शेअर करत मनसुबे जाहीर, जगाचं टेन्शन वाढणार
इस्त्रायलनं व्हिडीओ शेअर केला, इराणमध्ये हल्ला कुठं करणार याचे संकेत दिले, जगाचं टेन्शन वाढणार
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
Amit Shah: एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?
Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला? जबाबातील विसंगतीने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
गोविंदाच्या मिसफायरप्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना वेगळाच संशय, 'हिरो नंबर वन'ने ट्रिगर स्वत:च दाबला?
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
Embed widget