एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी, नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्समध्ये मिळणार, 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात 3 हजार जमा होणार!

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बीड : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केलेली आहे. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील. लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळीतील सभेत बोलताना घोषणा केली आहे. 

लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार

लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा 3 हजार रुपये दिले आहेत.  आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. बहिणींनी काही काळजी करु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं.  लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे. आताच मी अदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे. तिनं सांगितलं इतके हजार कोटी लागतील, तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या सुट्टी असेल, जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

लाडकी बहीण योजनेच्या तीन हप्त्यांचे पैसे जमा 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्या योजनेनुसार जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली होती. जुलै महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे पैसे पाठवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यांना 31 ऑगस्टला तीन हजार रुपये देण्यात आले.  सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना देखील 29 सप्टेंबरला पैसे देण्यात आले. आतापर्यंत तीन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देणार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये  10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत.  

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. 

इतर बातम्या: 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका, 18 बँक खाती सील, अदिती तटकरेंकडून यादी पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावाDevendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
Embed widget