India@47: 2047 पर्यंत भारताचा चेहरा-मोहरा बदलणार, मध्यमवर्गीय लोकसंख्येत होणार मोठी वाढ; वाचा सविस्तर
बिझनेस टुडे मासिकाच्या अहवालानुसार 2047 मध्ये मध्यमवर्गीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे.
Rise of Indian Middle Class: भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) आहे. देश एक मोठी जागतिक शक्ती म्हणून उदयास येण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. यामध्ये मध्यमवर्गीयांचं (middle class) मोठं योगदान आहे. दरम्यान, बिझनेस टुडे मासिकाच्या अहवालानुसार 2047 मध्ये मध्यमवर्गीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे.
गेल्या काही वर्षांत भारत एक मोठी जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ब्रिटन आणि फ्रान्सनंतर येत्या काही वर्षांत भारत जीडीपीच्या बाबतीत जर्मनी आणि जपानला मागे टाकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या वाटचालीत मध्यमवर्गीयांचे मोठे योगदान आहे.
मध्यमवर्गीयांची लोकसंख्या किती?
बिझनेस टुडे मासिकाच्या अहवालानुसार, 2047 मध्ये, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गाचा वाटा 60 टक्क्यांहून अधिक होईल. 2005 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गाचा वाटा केवळ 14 टक्के होता. देशात मध्यमवर्ग झपाट्याने वाढत असून, येत्या काही वर्षांत त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारतातील मध्यमवर्गीय लोकांची संख्या 1 अब्जाहून अधिक होईल. सध्या भारतात मध्यमवर्गाचा वाटा खूपच कमी आहे. Price Ice 360 च्या सर्वेक्षणानुसार, 2021 च्या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गाचा वाटा 30 टक्के होता. हे पुढील 10 वर्षांत म्हणजे आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 47 टक्के आणि आर्थिक वर्ष 47 पर्यंत 61 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
दरडोई उत्पन्नात वाढ होणार
भारतातील मध्यमवर्गीय लोकांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे भारताचे दरडोई उत्पन्नही वाढेल. SBI रिसर्चच्या अहवालानुसार, सध्या भारताचे दरडोई उत्पन्न सुमारे $2,500 इतके आहे. जे भारतीय चलनात सुमारे 2 लाख रुपये आहे. हा आकडा गेल्या आर्थिक वर्षातील आहे. SBI संशोधनानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न 2046-47 पर्यंत $12,400 पर्यंत वाढेल. म्हणजेच 2047 पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न 14.9 लाख रुपये होईल. देशाचे दरडोई उत्पन्न वाढवण्यात सर्वात मोठा हातभार लावणाऱ्या मध्यमवर्गासोबतच कनिष्ठ वर्गातील लोकांचे उत्पन्नही वाढणार आहे. जर आपण मध्यमवर्गावर नजर टाकली तर 2047 पर्यंत त्यात सामील होणार्या 61 टक्के लोकसंख्येचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढणार आहे.
10 वर्षात परतावा वाढला
2023-24 च्या मूल्यांकन वर्षात प्राप्तिकराचा नवा विक्रम झाला आहे. यावेळी 7.09 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत, जो आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 10 वर्षांपूर्वी आयटीआर भरणाऱ्यांची संख्या सुमारे 1.50 कोटी होती. याचा अर्थ गेल्या 10 वर्षांत आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 4 पटीने वाढली आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात केवळ 59.1 टक्के कर्मचारी करपात्र बेसमध्ये समाविष्ट होते. आर्थिक वर्ष 2047 पर्यंत त्यांचा हिस्सा 78 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि 56.5 कोटी लोक करपात्र आधाराखाली येतील.
महत्त्वाच्या बातम्या: