एक्स्प्लोर

मोठी बातमी! मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही 'लाडकी बहीण योजना'? महिलांना महिन्याला मिळणार 1500 रुपये

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली जाण्याची शक्यता आहे. तशा हालचाली प्रशासकीय पातळीवर चालू आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या राष्ट्रवादी (अजत पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाने आतापासूनच जपून पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर वर्षाला साधारण 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा भार पडेल.  

महाराष्ट्रात लवकरच लाडकी बहीण योजना? (Ladli Behna Yojana in Maharashtra)

'लोकसत्ता' या मराठी वृत्तपत्राने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार राज्यातील शिंदे सरकार लवकरच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलिकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? याचा या पथकाने अभ्यास केला आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात असल्याचे सांगितले जातेय. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेशमधील 'लाडली बहणा योजना' काय आहे? (What is Ladli Behna Yojana)

मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहणा योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच योजनेच्या जोरावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीतही येथे भाजपने 29 पैकी 29 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे हे प्रारूप महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला फायदा होईल, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना असावी. त्यामुळेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

योजनेचे स्वरुप काय असू शकते? (Benefits of Ladli Behna Yojana)

 या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महिलांना आर्थिक दृष्ट्‍या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे.

हेही वाचा :

सरकारच्या 'या' तीन कंपन्यात गुंतवणूक करणारे झाले मालामाल, दोन वर्षात तब्बल 1200 टक्क्यांनी रिटर्न्स!

मंगळवारी शेअर बाजारात काय होणार? कोैणते शेअर्स पडणार, कोणत्या शेअर्समध्ये तेजी!

आयडीबीआय बँकेतील नोकरीची 'ही' संधी सोडू नका, मिळणार चांगला पगार; जाणून घ्या अर्ज कसा करावा? पगार किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget